शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 12:45 AM2019-12-28T00:45:33+5:302019-12-28T00:45:53+5:30

सातपाटी किनारपट्टी परिसरात चिंता : महत्प्रयासाने पकडून आणलेले मासे अवकाळीमुळे कुजले, विवंचनेत पडली भर

Will fishermen be compensated as farmers? | शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळणार का?

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळणार का?

Next

हितेन नाईक

पालघर : अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई शासन पातळीवरून शेतकऱ्यांना दिली जात असताना मच्छीमारांच्या कुजलेल्या माश्यांची नुकसान भरपाईचा दर मात्र अजून ठरलेला नाही. कर्जाचे डोंगर डोक्यावर घेत पुन्हा मासेमारीला जाऊन किनाºयावर आणलेले मासे वाळत घालण्याच्या वेळेसच पुन्हा सातपाटीसह किनारपट्टीवर पावसाच्या सरी कोसळल्याने महत्प्रयासाने पकडून आणलेल्या माश्यांचे आता करायचे तरी काय? अशा विवंचनेत मच्छीमार महिला आहेत.

आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यासह राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील १ लाख ५ हजार १६५.७४ हेक्टरपैकी ५० हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाल्याने शासनाने त्यांना नुकसान भरपाईचे वाटप केले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकºयांचे दोन लाखपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. याच दरम्यान मच्छीमारांचे चक्रीवादळामुळे मासेमारीचे वाया गेलेले दिवस आणि अवकाळीमुळे कुजून गेलेल्या माशांच्या नुकसानीच्या भरपाईबाबत मात्र ना राज्य सरकार काही कार्यवाही करीत ना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोषणा करत. त्यामुळे मच्छीमार समाज व्यावसायिक अडचणीत सापडला आहे. मच्छिमार संघटनांनी, मच्छिमार नेत्यांनी आपल्या शिष्टमंडळासह नेहमीप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची निवेदने मंत्र्यांना दिली आहेत. मात्र २ महिन्याचा कालावधी पूर्ण होत आला तरी मच्छीमारांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. मच्छीमार सहकारी संस्थांकडून नुकसानीची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाकडून मागविण्यात आल्याचे कळते. त्यानंतरही नुकसान भरपाई देण्याबाबत केंद्र व राज्य सरकारकडून कुठलीही घोषणा केली जात नाही. शासनाने २०१५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या नैसर्गिक आपत्तीदरम्यान देण्यात येणाºया नुकसान भरपाईच्या आदेशात अवकाळी अथवा नैसर्गिक आपत्ती-दरम्यान झालेल्या माश्यांची नुकसान भरपाई देण्याबाबत कुठलेही आदेशच नमूद केलेले नसल्याने मच्छीमारांना भरपाई देण्यात जिल्हाधिकाºयांसह सर्व यंत्रणा हतबल ठरली आहे.

ढगाळ वातावरणामुळे मासे सुकवण्यात अडचणी
च्समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सातपाटीसह अनेक गावातील बोटी किनाºयाला लागल्या आहेत. आपल्या बोटीतून किनाºयावर उतरलेल्या बोंबील, मांदेली, करंदी हे मासे निवडून ते मासे बांबूच्या वलांदीवर सुकविण्याच्या बेतात असताना अचानक पावसाने सुरुवात केल्याने आता या माश्यांचे करायचे काय? असा गंभीर प्रश्न त्यांच्या चेहºयावर दिसून येत होता.

अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने बोंबील व इतर मासे सुकत नसून मार्गशिर्ष महिना सुरू असल्याने ओले मासेही संपत नसल्याने महिला वर्ग चिंतेत आहे. दुहेरी संकटात सापडलेल्या या महिलांपुढे कुटुंबाचे आर्थिक चक्र चालवायचे कसे? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून किनाºयावर पडलेल्या माश्यांकडे डोळ्यात पाणी आणून पाहण्याशिवाय आमच्यापुढे अन्य कुठला पर्याय शिल्लक नाही, असे हताश उद्गार योगिता मेहेर या महिलेने काढले.

मत्स्य उत्पादनाचा आकडा डळमळतोय : दिवसेंदिवस मत्स्य उत्पादनाचा आकडा डळमळू लागला असून सहकारी संस्था कर्जाच्या विळख्यात सापडू लागल्या आहेत. डिझेल अनुदानाचा थकलेला कोट्यवधी रुपयांचा आकडा, समुद्रातील वाढते प्रदूषण, वाढलेली महागाई आदी कारणांनी मच्छीमारी बोटी हळूहळू बंद पडू लागल्या आहेत, अशी चिंता सर्वोदय संस्थेचे अध्यक्ष पंकज पाटील यांनी व्यक्त केली.

Web Title: Will fishermen be compensated as farmers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.