शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

भाजपा विष्णू सवरांना दिल्लीला पाठविणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:28 AM

पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी सवरांचे चिरंजीव श्रीनिवास यांनी भरून काढावी असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे

नंदकुमार टेणीपालघर : पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी सवरांचे चिरंजीव श्रीनिवास यांनी भरून काढावी असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. तर सवरांना राज्याच्या राजकारणातून सन्माननीयरित्या दूर करण्यासाठी लाभलेली ही सुवर्णसंधी साधून त्यांना वनगांचे उत्तराधिकारी करावे. मात्र पालघरची पोटनिवडणूक जाहिर झाल्यास वनगा कुटुंबियांचे मन राखण्यासाठी तिची उमेदवारी श्रीनिवास यांना द्यावी व पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकीतील पालघर मतदारसंघातील भाजपची उमेदवारी सवरा यांना द्यावी, असाही एक विचारप्रवाह भाजपमध्ये आहे.राष्टÑवादीतून शिवसेनेत आलेले व आमदार झालेले कृष्णा घोडा यांचे निधन झाल्यानंतर पालघर विधानसभा मतदार संघाची उमेदवारी शिवसेनेने जशी त्यांचे पुत्र अमित यांना दिली. ते विजयी देखील झाले. राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते आर.आर. पाटील यांच्या निधनानंतर तासगावची उमेदवारी त्यांच्या पत्नी सुमनताईंना दिली गेली त्याही विजयी झाल्यात. याच न्यायाने वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी जर पोटनिवडणूक झाली. तर तिच्या करीता श्रीनिवास यांना उमेदवारी द्यावी अशी शिवसेनेची भूमिका आहे. मात्र भाजपने आपले पत्ते अद्याप उघड केलेले नाही.सवरा हे ज्येष्ठ नेते असले तरी कुशल प्रशासक म्हणून त्यांचा फारसा वकूब नाही ते स्वत: आदीवासी आहेत. असे असतानाही त्यांच्याकडे असलेल्या आदीवासी विकास मंत्रालयात सर्वाधिक घोटाळे झाले आहेत. भरती पासून ते पोषक आहारापर्यत एकही बाब भ्रष्टाचार मुक्त राहिलेले नाही. कुपोषण वाढलेले आहे. अशी बजबजपुरी त्यांच्या खात्यात माजली आहे. ते राहत असलेल्या वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांची कन्या नीशा सवरा दारुण पराभूत झाली. तसेच भाजपाचाही शिवसेनेने या नगरपंचायतीत जबरदस्त पराभव केला. सवरा हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री असतांनाही डहाणू नगर परीषदेच्या निवडणुकीमध्येच भाजपला यश मिळाले. जिल्ह्यातील वसई-विरार महापालिकेत बविआची सत्ता पालघर, जव्हार या नगरपालिका व मोखाडा व वाडा नगरपंचायतीत शिवसेनेची सत्ता आहे. तलासरीमध्ये मार्क्सवादी तर सवरांचा विधानसभा मतदार संघ असलेल्या विक्रमगड मध्ये निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडीची सत्ता आहे. म्हणजे डहाणूचा अपवाद वगळता सवरा पालकमंत्री असलेल्या पालघर जिल्ह्यात भाजपचे पानीपत झाले आहे. म्हणजेच संघटनात्मकदृष्ट्या, जिल्ह्यातील राजकारणावर पकड ठेवण्याच्या दृष्टीने सवरा फारसे प्रभावी ठरलेले नाहीत. त्यामुळे त्यांना राज्याच्या राजकारणातून सन्मानाने दूर करण्यासाठी पुढील वर्षी होणाºया लोकसभेच्या निवडणूकीसाठी पालघर मतदारसंघातून वनगांच्या जागी उमेदवारी द्यावी असा विचार प्रवाह भाजपामध्ये बळावतो आहे. निष्क्रीय नेत्याला सन्मानाने राज्यातून निरोप देणे व जिल्ह्यासाठी भाजपचा नवा चेहरा निर्माण करणे हे दोन्हीही पक्षी एका दगडात मारले जातील अशी या गटाची धारणा आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे देखील सवरांबाबत खूष नाहीत जिल्ह्यातल्या प्रसारमाध्यमांशीही सवरांची जवळीक नाही. एकीकडे शिवसेना आणि बविआ आक्रमकतेने जिल्ह्यात राजकारण करीत असताना त्याचा मुकाबला करू शकण्याइतके सामर्थ्य सवरांमध्ये नाही. अशी चर्चा भाजपमध्ये आहे.  आक्रमक शिवसेना, बविआचा सामना करण्यात अपयशशिवसेनेने ज्या पद्धतीने पालघर जिल्ह्याचे राजकीय सूत्रधार म्हणून सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना संधी दिली, जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून आमदार रविंद्र फाटक यांना तर जिल्हाप्रमुखपदी राजेशभाई शहा यांना नियुक्त केले. अशाच प्रकारचे संघटनात्मक बदल भाजपनेही करण्याची आवश्यकता आहे. ते होत नाहीत तो पर्यंत भाजपाला जिल्ह्यात चमकदार कामगिरी करता येणार नाही. असेच जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनाही वाटू लागले आहे. त्याबाबत दिल्लीश्वरांच्या कानावर गाºहाणी घातली गेली असून त्यावर गंभीरपणे विचार सुरू असल्याचे समजते.

टॅग्स :BJPभाजपा