शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या राजकारणात भाजपचे ‘डाव’खरे होतील?; शहराध्यक्षपदी निरंजन डावखरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 07:14 IST

ठामपा निवडणुकीत होणार शिंदे-आव्हाड यांच्याशी सामना

ठाणे : ठाणे भाजप शहराध्यक्षपदी आ. निरंजन डावखरे यांची नियुक्ती झाल्याने ठाण्यातील राजकारणातील वसंत डावखरे यांच्या निधनानंतर दुर्लक्षित झालेला ‘डावखरे फॅक्टर’ पुन्हा चर्चेत आला आहे. येत्या ठाणे महापालिका निवडणुकीत मंत्री एकनाथ शिंदे व मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या महाविकास आघाडीचा सामना निरंजन यांना करावा लागणार आहे.

ठाण्याच्या राजकारणात स्व. आनंद दिघे यांचे स्थान जेवढे महत्त्वाचे राहिले आहे, तेवढेच स्व. वसंत डावखरे यांचे स्थान बहुचर्चित राहिले आहे. अगोदर काँग्रेस व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहिलेल्या डावखरे यांची ‘मातोश्री’शी जवळीक होती. त्यामुळे अनेकदा थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आपले ‘डाव’खरे करून घेण्यात वसंतराव यशस्वी झाल्याचे अनेकदा पाहायला मिळाले. वसंत डावखरे हे दीर्घकाळ विधान परिषदेचे उपसभापती होते. तेव्हा त्यांचा ठाण्यातील राजकारणावर वरचष्मा होता. या पदावरील त्यांची मुदत संपुष्टात आल्यानंतर व अखेरचे काही दिवस त्यांची प्रकृती खराब असल्याने ठाण्याच्या राजकारणातील डावखरेंचा दबदबा कमी झाला होता.

ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांच्याजागी आता कोकण पदवीधर मतदारसंघाचे आ. निरंजन डावखरे यांची नियुक्ती केलेली आहे. निरंजन यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपत प्रवेश केला आहे. राज्यात सर्वाधिक जागा मिळवूनही सत्ता स्थापन करण्यात भाजपला अपयश आले. त्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या नियुक्त्यांमध्ये निरंजन यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ही आव्हानात्मक असणार आहे. ठाणे महापालिका निवडणूक महाविकास आघाडी लढवणार असेल, तर कदाचित शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढण्याची शक्यता आहे. अशावेळी राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या या दोन मातब्बर मंत्र्यांचा सामना डावखरे यांना करावा लागेल.ठामपावर भाजपचा झेंडा फडकविणार : आमदार डावखरेआगामी काळात ठाणे शहरातील संघटनात्मक बांधणीवर भर दिला जाईल. त्याचबरोबर २०२२ साली होणाºया निवडणुकीत महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवू, असा दावा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आ. निरंजन डावखरे यांनी केला. महापालिका निवडणुकीला अजून सव्वादोन वर्षांचा अवधी आहे. त्यापूर्वी भाजपची संघटना कानाकोपऱ्यांत पोहोचवण्यास प्राधान्य दिले जाईल. सध्या ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचा आमदार आहे. अन्य मतदारसंघांत विरोधी पक्षांचे आमदार आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांना भाजपची मोलाची साथ मिळाली होती.

टॅग्स :BJPभाजपाNiranjan Davkhareनिरंजन डावखरे