शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

बहुजन चेहरा असेल वसई - विरारचा आगामी महापौर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 23:43 IST

५ आॅगस्ट रोजी महासभा : नव्या महापौरनिवडीचे सर्व हक्क हितेंद्र ठाकूर यांच्याकडे

वसई : वसई - विरारचा आगामी महापौर म्हणून बहुजन चेहऱ्याला संधी मिळाली तरी आश्चर्य वाटू नये, अशी परिस्थिती सध्या शहरात आहे. या महापौर निवडीचे सर्व हक्क हे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आ. हितेंद्र ठाकूर यांच्याकडे असून लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका आणि आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच असा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

वसई - विरार महापालिकेचे मावळते महापौर रुपेश जाधव यांनी गेल्या आठवड्यात महापौरपदाचा राजीनामा पक्षनेते आ. हितेंद्र ठाकूर आणि आयुक्त बी.जी.पवार यांच्याकडे सुपूर्द केला. विशेष म्हणजे अजूनही राजीनामा दिलेले महापौर जाधव हे आजही तांत्रिकदृष्ट्या महापौर असले तरी प्रत्यक्षात हा एकूणच कारभार कायद्यानुसार आयुक्तांनी उपमहापौर प्रकाश रोड्रिक्स यांच्याकडे सोपवला आहे.महापौरांनी दिलेला राजीनामा रीतसर मंजूर करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने ५ आॅगस्ट रोजी एका विशेष महासभेचे आयोजन केल्याची माहिती पालिका आयुक्त बी.जी. पवार यांनी लोकमतला दिली. या महासभेत महापौर जाधव यांनी दिलेला राजीनामा मंजूर करून तो ६ आॅगस्ट रोजी आयुक्तांच्या माध्यमातून विभागीय (महसूल) कोकण आयुक्त यांच्याकडे सोपविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.महापौरपदासाठी वसई - विरार महापालिकेतील काही दिग्गजांची नावे चर्चेत आहेत. तरीही या निवडीबाबत आ. हितेंद्र ठाकूर हे अंतिम निर्णय घेतील. ५ आणि ६ आॅगस्टला महापौर निवडी संदर्भात प्रक्रिया होणार असून आॅगस्ट महिन्याच्या दुसºया आठवड्यात नव्या महापौरांची निवड अपेक्षित आहे.दरम्यान, वसई - विरारचा नवा महापौर निवडताना यावेळी आ. ठाकूर यांना आगामी विधानसभा निवडणूक आणि पुढील वर्षीची महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सर्वसमावेशक असा बहुजन चेहरा महापौर म्हणून द्यावा लागेल. यासाठी समाजातील अनेक समाज धुरिणांना यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणे अथवा व्यापक समाजाला न्याय देण्याचा एक प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे. याबाबत ठाकूर यांची प्रतिक्रि या जाणून घेण्यासाठी संपर्क केला मात्र तो झाला नाही.पालिका आयुक्त म्हणून माझ्याकडे महापौरांनी राजीनामा दिला असून आता पुढील महिन्यात होणाºया महासभेत त्याला रितसर मंजुरी मिळेल. मात्र, तोपर्यंत महापौर पदाचा कार्यभार उपमहापौर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. महासभेची मंजुरी मिळाली की शासनातर्फे पीठासीन अधिकारी नियुक्त होऊन महापौर पदासाठी निवडणूक होईल, त्यामध्ये नवा महापौर ठरवला जाईल.-बी.जी.पवार, आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्यालय

टॅग्स :Vasai Virarवसई विरारElectionनिवडणूकMayorमहापौर