शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आपण देश कोणाच्या हातात देणार आहोत - ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 03:37 IST

काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर प्रखर टीका : स्थानिक प्रश्न सोडविण्याचे आश्वासन

बोईसर : काँग्रेसने जाहिर केलेल्या जाहिरनाम्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी प्रखर टीका करून आपण कोणाच्या हातात देश देणार आहोत असा प्रश्न विचारून स्थानिक समस्या प्राधान्याने सोडविणयात येतील असे आश्वासन दिले त्यांनी मनोरपासून नागझरी, बोईसर मार्गे पाचमार्ग, चिंचणी डहाणू असा दौर करून ठिकठिकाणी जनतेशी संवाद साधला.

लोकसभेच्या पालघर मतदार संघाच्या निवडणूकी तील शिवसेना -भाजपा युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ ठाकरे यांचा हा दौरा आयोजित केला होता या वेळी सेना भाजपाचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. प्रत्येक भागातील नागरिकांशी संवाद साधतांना त्यांनी तारापूर अणुउर्जा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त व बाधित कामगारांचा प्रश्न, पालघर जिल्ह्यात सुसज्ज हॉस्पिटल, चौपदरी रस्ता, दांडी-नवापूर पूल इत्यादी समस्या बरोबरच वाढवण बंदराबाबत शिवसेना जनतेसोबत असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. या प्रचार दौऱ्यात हिंदूत्वासाठी युती करणे गरजेचे होते म्हणून युती केल्याचे सांगितले. तर वाढवण बंदराच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी १९९८ साली वृत्तपत्रांत आलेल्या बातम्याची कात्रणे लोकांना दाखवून त्यावेळी नागरीकांनी विरोध केला म्हणून आम्ही हे बंदर रद्द केले. तसेच तेव्हापासून आताही स्थानिकांचा विरोध असेल तर वाढवण बंदर होऊ देणार नाही. असे ते म्हणाले.शिवसेना व भाजपाच्या दोघांच्या मनात भगवा आहे. २०१४ साली च्या निवडणूकीतही देश भगवामय झाला होता असे ठाकरे यांनी सांगून गाविताना भरघोस मतानी निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले.जीवघेणा विकास नको!विकास हवा आहे परंतु असा जीवघेणा विकास नको आम्ही नाणार रिफायनरीला स्थानिकानी विरोध केल्यानंतर ती रद्द करण्यास आम्ही सरकारला भाग पाडले आहे असे उध्दव ठाकरे यांनी जनसमुहाला सांगत पुन्हा एकदा वाढवण बंदराबाबत विरोधाची भुमिका असल्याचे सांगितले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे