शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

नगराध्यक्ष होणार कुणाचा?

By admin | Updated: December 23, 2016 02:52 IST

विक्रमगड, तलासरी, मोखाडा या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुका शुक्रवारी होत असून

पालघर : विक्रमगड, तलासरी, मोखाडा या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुका शुक्रवारी होत असून तलासरीच्या नगराध्यक्षपदी माकपच्या स्मिता वळवी यांची निवड होण्याची चिन्हे असून मोखाड्याच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या मंगला चौधरी या बिनविरोध विराजमान होणार आहेत. तर विक्रमगडच्या बहुचर्चित नगराध्यक्षपदी कोण विराजमान होईल, हे गुलदस्त्याच राहिेले आहे. विक्रमगडात उत्सुकता शिगेलाविक्रमगड : शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीत कोणत्या आघाडीचा नगराध्यक्ष होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विक्रमगड विकास आघाडी आणि जागृत परिवर्तन आघाडी यांनी आपलाच नगराध्यक्ष होणार असे दावे केले आहेत. जागृत परिवर्तन पॅनलचे ६ नगरसेवक असून विक्रमगड विकास आघाडी काँग्रेस यांच्याकडे ७ नगरसेवक आहे. भाजपचे २ शिवसेनेचा व राष्ट्रवादीचा प्रत्येकी १ असे बलाबल आहे. त्यामुळे या ४ नगरसेवकांना महत्व प्राप्त झाले आहे काही दिवसापूर्वीची जागृत परिवर्तन पॅनल व भाजप युतीची आशा मावळली आहे त्यामुळे भाजप शिवसेना व राष्ट्रवादीचे नगरसेवक कोणाच्या पाठीशी उभे राहतात हे उद्याच स्पष्ट होणार आहे. विक्रमगड विकास आघाडीला राष्ट्रवादीच्या १ नगरसेवकांचा पाठींबा काल जाहीर झाला. परंतु राष्ट्रवादीने घूमजाव केल्यामुळे ते चित्रही फिसकटले आहे. काही दिवसापूर्वी नगरसेवकांची पळवापळवी ही झाली होती परंतु नंतर समीकरणे बिघडली त्यामुळे खरे चित्र निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.तलासरीच्या नगराध्यक्षपदी स्मिता वळवी?तलासरी नगर पंचायत नगराध्यक्ष पदाची निवडणूक शुक्र वारी दुपारी होत असून नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गेल्यात पडते या कडे तलासरी तील जनतेचे लक्ष लागले आहे. तलासरी नगर पंचायतीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने तलासरी चा पहिला नगराध्यक्ष त्याचाच होणार आहे नगराध्यक्ष पदासाठी माकपतर्फे स्मिता सुरेश वळवी व रामिला संदेश जवालिया या दोघीनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला स्मिता वळवी हिची वर्णी लागण्याची जास्त शक्यता आहे तसेच उपनगराध्यक्षपदासाठी सुरेश भोये यांनी अर्ज दाखल केला आहे.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने पक्ष जो उमेदवार निश्चित करेल तोच नगराध्यक्ष बनणार पण निवडणूक सोपस्कार म्हणून उद्याची नगराध्यक्ष ची निवडणूक होत आहे.मोखाडा नगराध्यक्षपदी मंगला चौधरी तर उपनगराध्यक्षपदी महानंदा पाटील विराजमान होणारउदया होणाऱ्या मोखाडा नगर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेच्या मंगला चौधरी तर उपनगराध्यक्षपदी महानंदा पाटील यांच्या वर्णी लागणार आहे.नगरपंचायतीच्या १७ प्रभागाच्या झालेल्या निवडणुकीत भाजपा १ काँग्रेस १ राष्ट्रवादी २ तर सेनेने १७ पैकी १३ जागांवर निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले होते यामुळे सेनेचा नगराध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट असताना राष्ट्रवादीच्या वैशाली माळी यांच्याकडून अर्ज सादर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.परंतु आज माघारीच्या दिवशी राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासाठी भरलेला अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असून नगराध्यक्षपदी मंगला चौधरी यांची तर उपनगराध्यक्षपदी महानंदा शांताराम पाटील यांची निवड होणार हे निश्चित झाले आहे.