शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

गावांचे कारभारी कोण होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 23:49 IST

जिल्ह्यात तीन ग्रामपंचायतींची आज निवडणूक : अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती

लोकमत न्यूज नेटवर्क पालघर/पारोळ : पालघर जिल्ह्यात सत्पाळा, पाली व सागावे या तीन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. पालघर तालुक्यात एक आणि वसईत दोन ग्रामपंचायतींत मतदान होत असल्याने प्रशासनाने सर्व व्यवस्था पूर्ण केली आहे. वसई तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये ७ मतदान केंद्रे असून ३५ कर्मचारी यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी  आहे. कोरोना महामारीबाबतचे नियम, अटी पालून मतदारांना मतदान करावे लागणार आहे. 

वसई तालुक्यात होत असलेल्या या निवडणुकीत सत्पाळामध्ये ९०१ मतदार मतदान करणार असून यामध्ये ४७० पुरुष, तर ४३१ महिलांचा समावेश आहे. ११ जागांसाठी या ठिकाणी मतदान होणार आहे. तर पाली ग्रामपंचायतीत ४ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत ६२३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून यात ३१४ पुरुष व २०९ महिला मतदार आहेत. ३ उमेदवार या ठिकाणी बिनविरोध आल्याने चार जागांसाठी या ठिकाणी निवडणूक होणार आहे. पालघरमधील सागावे येथेही चुरशीची निवडणूक होत आहे.

पालघर तालुक्यातील सागावे ग्रामपंचायतीच्या एकूण ७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत ३ जागा बिनविरोध झाल्याने चार जागांसाठी निवडणूक होत असून एकूण ८ उमेदवार रिंगणात आहेत. सागावे ग्रामपंचायतीच्या ३ प्रभागातील ७ जागांसाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ७ पैकी ३ ठिकाणी एकच उमेदवाराचा अर्ज राहिल्याने ३ प्रभाग बिनविरोध झाले. त्यामुळे शुक्रवारी ४ जागांसाठी ८ उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत रंगणार आहे.

मतदानासाठी सुट्टी आणि सवलत जिल्ह्यातील पालघर व वसई तालुक्यांतील तीन ग्रामपंचायतींसाठी मतदान होत असल्याने या भागातील सर्व आस्थापनांतील कर्मचारी यांना मतदान करण्यासाठी सार्वजनिक सुट्टी देण्याचे, तर अतिमहत्त्वाच्या आस्थापनातील कामगारांना दोन तास मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याचे आदेश पालघरचे कामगार उपआयुक्त दहिफळकर यांनी दिले आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता कोरोना प्रादुर्भावाचा धोका अद्याप संपलेला नाही. कोरोनाकाळात होत असलेली ही निवडणूक नियम आणि अटी पाळून करावी लागत असल्याने प्रशासनापुढे हे मोठे आव्हान आहे. 

वसई तालुक्यात कोरोनाचे सर्व नियम आणि अटी पाळून  सत्पाळा आणि पाली या ग्रामपंचायतीमध्ये १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाने सर्व चोख व्यवस्था ठेवलेली आहे.  - उमाजी हेडकर, नायब तहसीलदार, वसई

कडक पोलीस बंदोबस्तजिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काही प्रभागांमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत. तसेच काही प्रभागांत नात्यांतील माणसे एकमेकांविरूद्ध उभी ठाकली आहेत. तसेच काही गावांमध्ये असलेल्या तणावामुळे  कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तीनही ग्रामपंचायतींच्या ठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर