शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू पंचायत समिती सभापती पदावर कोण विराजमान होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 22:50 IST

महाविकास आघाडीची शक्यता : राष्ट्रवादी मोठा पक्ष, पण एकहाती सत्ता नाही

शौकत शेख डहाणू : पालघर जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच झाल्या. डहाणू पंचायत समितीत ९ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, त्यांना शिवसेना किंवा भाजपची साथ घेतल्याशिवाय, पंचायत समितीवर सत्ता स्थापन करता येणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्याप्रमाणे जिल्ह्यात आणि तालुक्यातही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आणि काँग्रेसशी महाविकास आघाडीचे संकेत आहेत.

डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १३ जागांसाठी, तर पंचायत समितीच्या २६ जागांसाठी अटीतटीची निवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, माकप, मनसे, या सर्व राजकीय पक्षांनी कोणाशीही युती, आघाडी न करता स्वतंत्रपणे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते.

डहाणू पंचायत समितीच्या २६ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला ९, शिवसेना ८, भाजप ७ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला २, जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.राज्याप्रमाणेच डहाणू पंचायत समितीवरही सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत. डहाणू पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे सर्वाधिक ९ उमेदवार निवडून आल्याने, सभापतीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उपसभापतीपद शिवसेनेकडे जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

डहाणू पंचायत समितीचे सभापती पद हे अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित असून, उपसभापती पद हे सर्वसाधारण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सभापतीपदासाठी पिंटी रमेश बोरसा, स्नेहलता सिताराम सातवी, आणि अरुणा सुनील भावर, या तीन अनुसूचित जमातीतील महिलांचा पर्याय उपलब्ध आहे.डहाणू पंचायत समितीवर सत्ता स्थापनेसाठी राज्याप्रमाणे महाविकास आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याप्रमाणे हालचाली सुरू झाल्या आहेत, वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे योग्य तो निर्णय घेतला जाईल. -राजेश पारेख, राष्ट्रवादी काँग्रेस, पालघर, विधानसभा मतदारसंघ, अध्यक्ष

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस