शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
3
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
4
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
5
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
6
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
7
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
8
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
9
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
10
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
11
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
12
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
13
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
14
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
15
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
17
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
18
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
19
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
20
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...

पांढऱ्या कांद्याने आणले ‘त्या’ शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 2:57 AM

आम्ही ८ एकर जागेत ८ किलो कांद्याच्या बियाणांची लागवड केली. आमच्या मुलांनी अन्य ठिकाणी केलेल्या पैशांची गुंतवणूक याच कांद्यात केली

राहुल वाडेकरविक्रमगड : पांढऱ्या कांद्याचे आगार म्हणून ओळख असलेल्या म्हसरोली येथील शेतकऱ्यांच्या डोळ्यात याच कांद्याने अक्षरशः पाणी आणले आहे. कांद्याच्या लागवडीला लागलेल्या रोगाने आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. या रोगाबाबत कृषी विभागाकडून मार्गदर्शन केले जात आहे.

म्हसरोली गावात सुमारे १०० एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली जात आहे. सफेद कांद्याला एकरी ३० ते ४० हजार खर्च येत असून यातून ५० ते ६० हजार रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळते. येथील पांढरा कांदा उत्तम दर्जाचा असल्याने त्याला मोठी मागणी असते. मागील वर्षी ऐन हंगामात कोरोनाचा कहर वाढल्याने शेतकरी भुईसपाट झाला. मिळेल त्या भावाला कांदा विकून शेतकरी हवालदिल झाला. मात्र, या वर्षी कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेवर पुन्हा नव्याने उभारी घेत शेतकऱ्याने जानेवारी महिन्यात कांदा लागवड केली. सातत्याने वातावरणात होणारे बदल यामुळे उद्भवणारी बुरशीजन्य रोगराई कांदा उद्ध्वस्त करीत आहे. यासोबतच येथील शेतकऱ्यांनी लागवड केलेली मिरचीदेखील करपून जात असून,  आजारावर योग्य औषधोपचार होत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मार्गदर्शन केले. भाजीपाल्याचा विमा काढावा, जेणेकरून सुरक्षा कवच मिळेल, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र विमा काढण्यात अडचणी येतात, असे येथील शेतकरी अशोक घरत यांनी  सांगितले.

आम्ही ८ एकर जागेत ८ किलो कांद्याच्या बियाणांची लागवड केली. आमच्या मुलांनी अन्य ठिकाणी केलेल्या पैशांची गुंतवणूक याच कांद्यात केली, मात्र बुरशीमुळे कांदा खराब होत असल्याने आम्हाला मोठे नुकसान सोसवे लागणार आहे.  - रमेश परशुराम घरत, शेतकरी, म्हसरोली

काही शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात  जाऊन पाहणी करून मार्गदर्शन केले. शेतकरी व कृषी सेवा केंद्रदेखील अनेकदा चुकीची औषधे देतात. त्यामुळे उलट परिणाम दिसून येण्याची शक्यता असते.- आर.यू. इभाड, विक्रमगड तालुका कृषी अधिकारी.