शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

प्रारूप आराखड्याला मंजुरी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 11:32 PM

निवडणूक आयोगाकडे लक्ष । आरक्षण तारीख पुढे जाण्याची शक्यता, अद्यापही संभ्रम कायम

अंबरनाथ/बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकांनी प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तयार करून तो अंतिम मंजुरीसाठी निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. मात्र, त्या आराखड्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे आरक्षण सोडतीची तारीख पुढे जाण्याचे संकेत विश्वसनीय सूत्राने ‘लोकमत’ला दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार नगरपालिका प्रशासनाने अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. हा आराखडा पाठवून दोन दिवस उलटले तरी त्याला अंतिम मंजुरी मिळालेली नाही. प्रभागनिश्चितीचे आदेश होत नाही, तोपर्यंत प्रभागांचे आरक्षण काढणे शक्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रतीक्षा केली जात आहे. मात्र, आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्याला मंजुरी न दिल्याने आरक्षण सोडत पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. मात्र, नवीन आदेश अद्याप न आल्याने पालिका अधिकारी संभ्रमात आहेत. दुसरीकडे निवडणूक आरक्षण सोडतीसाठी होणारा विलंब हा राजकीय हस्तक्षेपामुळे होत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. यासंदर्भात अधिकारी मात्र काहीही बोलण्यास तयार नाहीत. केवळ निवडणूक आयोगाचे आदेश येतील त्याप्रमाणे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आमिषाला बळी पडू नका - पवारअंबरनाथ : अंबरनाथ पालिका निवडणुकीत आरक्षित वॉर्ड हे निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणेच पडणार आहेत. त्यामुळे शहरात कोणी आरक्षण बदलून देतो, असे सांगून पैसे लाटत असले तर त्यांच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन मुख्याधिकारी देविदास पवार यांनी केले आहे. शनिवारच्या ‘लोकमत’मध्ये ‘आरक्षणबदलासाठी घोडेबाजार’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले. त्या अनुषंगाने मुख्याधिकाऱ्यांनी शनिवारी तातडीची पत्रकार परिषद घेत नागरिकांना आवाहन केले आहे. निवडणूक आरक्षणात कुणी घोडेबाजार करत असेल, तर त्यांच्या आमिषाला बळी पडू नका. निवडणूक आयोगाचे आदेश काटेकोरपणे पाळले जात आहेत. त्यात कोणतीही हेराफेरी होणे शक्य नाही. तसेच जे बदल घडतात, त्याची सर्व माहिती ही संकेतस्थळावर टाकली जाते. सर्वांना माहितीसाठी नकाशे आणि प्रारूप आराखडे मिळतील. तसेच जे आरक्षण पाडण्यात आले आहे, त्या आरक्षणाचा खुलासाही केला जाईल, असे पवार म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथ