शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

वावर, वांगणीतील रस्ते ७० टक्के पूर्ण

By admin | Updated: April 9, 2017 01:04 IST

१९९२ पासून गाजत असलेल्या व गुजरात व दादरा नगर हवेली यांच्या सीमेवर असलेल्या जव्हार तालुक्यातील वावर वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते आता चका चका होण्याच्या मार्गावर

- हुसेन मेमन,  जव्हार१९९२ पासून गाजत असलेल्या व गुजरात व दादरा नगर हवेली यांच्या सीमेवर असलेल्या जव्हार तालुक्यातील वावर वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते आता चका चका होण्याच्या मार्गावर असून नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.दऱ्या खोऱ्यात असलेल्या वावर-वांगणी या गावातील कुपोषणामुळेच जव्हार येथे अप्पर जिल्हाधिाकरी कार्यालयाची स्थापना तात्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी केली होती, परंतु त्यानंतर या गावात काहीच झाले नाही. मात्र आता या परिसरातील रस्त्यांची ७० टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार असल्याने रहिवाशांना चकाचक रस्ते वापरायला मिळणार आहेत. दर वर्षी पावसाळ्यात या गावांना जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नव्हता तसेच या परिसरात पाऊस प्रचंड पडत असल्याने हे मार्ग नेहमीच पुराच्या पाण्याखाली जात असतात. त्यामुळे पूर असतांना संपर्क तुटलेला आणि तो ओसरल्यावर मार्ग चिखलाने भरलेला अशी अवस्था असायची परंतु आता या रस्त्यांमुळे पूर ओसरताच रस्ते वापरायला मिळणार आहेत. तसेच बससेवा सुरू होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे. जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम म्हणून ओळखला जाणारा भाग म्हणजे वावर वांगणी ग्रामपंचायत या ग्रामपंचायत हद्दीत १२ पाडे २ महसूल गावे असे १४ गाव-पाडे असून या त््यांची एकूण लोकसंख्या ३ हजार २०० आहे. हा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असल्याने या भागात गेल्या अनेक वषार्पासून रस्ते कच्चे आणि खड्डेमय होते. त्यामुळे काळी पिवळी सुद्धा या परिसरात येत नव्हती. दुचाकी अथवा अन्य वाहन वापरणेही अशक्य होते. परिवहनाची नेहमीच गैरसोय, त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षक, आरोग्य कर्मचारी अशा सगळ्यांचेच दुर्लक्ष अशा अनेक समस्यांनी हा परिसर ग्रस्त होता. त्याला आता विकासाची नवी पहाट दिसू लागणार आहे. तेरा कोटी खर्च, विकास होणार गतिमान- या भागात रस्त्याची सोय व्हावी म्हणून लोकमतने सातत्याने आवाज उठविला होता. त्यामुळे वावर वांगणी भागातील रस्त्याचे काम जलद गतीने चालू झाले आहे. वावर वांगणी भागात जाण्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत १३ कोटी रुपये खर्च करून गेल्या दोन वषार्पासून सुरु असलेले रस्त्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून ते पावसाळ्यापूर्वी संपण्याची शक्यता आहे. या रस्त्याचे काम यावर्षी शंभर टक्के पूर्ण होणार आहे. त्यामुळे या भागातील परिवहनाची समस्या मार्गी लागणार आहे.