शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

मोखाड्यात पाणीटंचाईचा वैशाख वणवा सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 00:22 IST

मोखाडा तालुक्यातील ४ गावे आणि ११ पाड्यांना सहा टँकरने मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे.

- रवींद्र साळवेमोखाडा : ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी अवस्था असलेल्या मोखाडा तालुक्यात लहान-मोठी पाच धरणे असतानाही पाणीटंचाईचा वैशाख वणवा सुरू झाला आहे. तालुक्यातील ४ गावे आणि ११ पाड्यांना सहा टँकरने मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे येणारे दोन महिने उष्णतेचे असल्याने भविष्यात पाणीटंचाई तीव्र होणार असल्याने नागरिक चिंता व्यक्त करू लागले आहेत.तालुक्यातील पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत, ठक्कर बाप्पा योजना, लघुपाटबंधारे, नळपाणीपुरवठा आदी विभागांच्या माध्यमातून विविध योजनांमार्फत कोट्यवधी रुपयांचा खर्च वर्षनिहाय केला जात असतानाही पाणीटंचाई का? यंदा उशिरा का होईना ४ गावे आणि ११ पाड्यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. गेल्या वर्षी जवळपास टंचाईग्रस्त गाव-पाड्यांनी शंभरी गाठली होती.नगरपंचायतीच्या टंचाईग्रस्त गाव-पाड्यांसह ३० टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. यंदा पावसाने उशिरापर्यत जरी मुक्काम ठोकला असला तरी उशिरा का होईना पण तालुक्यात पाणीटंचाईने डोके वर करायला सुरुवात केलेली आहे. टँकर अधिग्रहण करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनास दिलेले असल्याने टँकर सुरू होण्यास विलंब होत असल्याचा प्रत्यय नुकताच टंचाईग्रस्त गाव-पाड्यांना येऊन गेला. त्यामुळे संपूर्ण वर्षभरात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बंधारे, विहिरीमधील गाळ काढणे, शेततळे बांधणे, लघुपाटबंधारे, वन विभागाचे बंधारे, नळपाणीपुरवठा योजना, सिंचन विहिरी आदीसह कोट्यवधी रुपयांचा खर्च झालेला आहे.महिलांची पायपीट सुरूमार्चच्या सुरुवातीलाच पाणी-टंचाईची भीषणता जाणवत असून महिलांची मैलो-न्-मैल पायपीट सुरू झाली आहे.तालुक्यात पाणी अडवण्यासाठी भूमिगत बंधारे तयार करण्यात आले आहेत. मात्र याचा फायदा नेमका किती झाला याचे उत्तर आजही प्रशासनाकडे नाही.

टॅग्स :palgharपालघरwater scarcityपाणी टंचाई