शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात नियोजनाअभावी पाण्याचे दुर्भिक्ष !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 08:29 IST

जिल्ह्यात सूर्या, वैतरणा, तानसा या बारमाही वाहणाऱ्या नद्या, पाणी साठवणारे धामणी, कवडास, वांद्री प्रकल्प धरणे तसेच ६ लघु पाटबंधाऱ्यात ओव्हरफ्लो होतील इतका पाणीसाठा असतो.

- हितेन नाईकपालघर समन्वयकपालघर जिल्ह्यात नद्या, धरणे आणि लघुपाटबंधारे योजनेतून मोठा पाणीसाठा उपलब्ध असतानाही गेल्या ४० वर्षांपासून मोखाडा, जव्हार, विक्रमगड, वाड्यासह जिल्ह्यातील इतर काही तालुक्यांतील गावपाड्यांत पाणीटंचाईची भीषण दाहकता आहे. पाण्याचे शाश्वत स्रोत उपलब्ध असतानाही पाणीपुरवठ्याच्या नियोजनाच्या अभावामुळे एक भांडे पाण्यासाठीही महिलांना तळ गाठलेल्या विहिरीत धोका पत्करून उतरावे लागते, असे भीषण चित्र दिसत आहे.

जिल्ह्यात सूर्या, वैतरणा, तानसा या बारमाही वाहणाऱ्या नद्या, पाणी साठवणारे धामणी, कवडास, वांद्री प्रकल्प धरणे तसेच ६ लघु पाटबंधाऱ्यात ओव्हरफ्लो होतील इतका पाणीसाठा असतो. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी २,३६७ मिलिमीटर इतका पाऊस होतो, तरीही मार्च सुरू होताच इथल्या महिला पाण्यासाठी खाचखळग्याची वाट तुडवत, डोक्यावर हंडा घेऊन आजही वणवण फिरत असतील तर त्यांच्या एक एक पाण्याच्या थेंबाची व्यथा सरकारला कळत कशी नाही? हा खरा प्रश्न आहे.

योग्य नियोजनाच्या अभावाने ही कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत आहे. स्थानिकांच्या नजरेसमोर इथले पाणी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई- विरार येथे मोठ्या पाइपलाइनद्वारे नेले जाते. मात्र उपलब्ध असणाऱ्या धरण आणि लघुपाटबंधारे योजनेच्या जवळच्या गावांतील लोकांना पाइपलाइनद्वारे घराघरांत पाणी देणे का शक्य होत नाही? हा प्रश्न अनुत्तरितच आहे; परंतु सहजसोपा मार्ग अवलंबण्याऐवजी जलजीवन मिशनच्या ‘हर घर नल से जल’द्वारे कोट्यवधींचा निधी खर्च करूनही मागील चार-पाच वर्षांपासून प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण व्हायला अजून दोन वर्षे स्थानिकांना ताटकळत राहावे लागणार. याची जबाबदारी निश्चित केली जात नाही. 

संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि स्थानिक प्रशासनात समन्वयाचा अभाव असल्याने ही योजना आरोप-प्रत्यारोप करत कासवाला लाजवेल इतक्या धीम्या गतीने सुरू आहे.  सूर्या नदीतून डहाणू तालुक्यातून वेती येथे एमएमआरडीएच्या माध्यमातून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला असून, ते पाणी मीरा-भाईंदर, वसई-विरार येथे नेले जात असताना त्याच योजनेतून डहाणू तालुक्यातील ४ गावे आणि पालघर तालुक्यातील ११ गावे अशा १५ गावांना पाणी देणे सहज शक्य असल्याचे कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांनी सांगितले. मात्र, तेथील स्थानिकांच्या डोळ्यादेखत त्यांचे पाणी इतरत्र वळवताना त्यांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून जलजीवन मिशन अंतर्गत डहाणू तालुक्यातील १७४ गावांसाठी १२ योजना, तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ६० गावांसाठी ९ योजना कार्यान्वित करण्यात केली तरी या जलजीवन मिशनचा बट्ट्याबोळ झाल्याने महिलांना आजही भरदुपारी पाण्यासाठी डोंगरमाथ्यावर वणवण फिरावे लागते. एमएमआरडीएच्या माध्यमातूनच पाणीपुरवठा व्हावा अशा १५ गावांतील लोकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी स्थिती स्थानिकांची आहे. स्थानिकांच्या घशाला पडलेली ही कोरड दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी एकत्र येत नसल्याची खंत मात्र नागरिक बोलून दाखवतात. 

जिल्ह्यामध्ये एकूण ८ तालुक्यांत ४७३ ग्रामपंचायती आणि ८९९ गावे आहेत, तसेच ४,७१० वाड्या असून एकूण लोकसंख्या १७,४९,२१० इतकी आहे. एकूण ग्रामीण कुटुंबांची संख्या ४,५२,०४३ इतकी आहे. ३,०७,९९५ कुटुंबांना नळजोडणी पुरवली आहे. जिल्ह्यातील एकूण ८९९ गावांपैकी ६१४ गावांना ५६२ योजनांद्वारे जिल्हा परिषद पालघरअंतर्गत तर २६ योजनांद्वारे २८२ गावे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत जलजीवन मिशन योजनेतून पाणी देण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :Waterपाणी