राज्यात गणपतीची धूम सुरू असताना पालघर जिल्ह्यात पावसाचा चांगलाच जोर आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने वसई - विरारच्या नागरिकांची पुरती वाट लावत जनजीवन विस्कळीत केले आहे. जून अखेरच्या आठवड्यापासून आजपर्यंत तब्बल चार वेळा अवघी वसई तुंबली आहे. थोड्याफार फरकाने संपूर्ण पालघर जिल्ह्यात हीच परिस्थिती दिसते आहे. घरात, तसेच गणपतीच्या मांडवात तर पावसाचे गुडघाभर पाणी साचून राहिल्याची स्थिती सध्या वसई विरार व नालासोपारा येथे पहायला मिळते आहे. त्याचीच ही काही क्षणचित्रे.
पालघर जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:25 IST