चोऱ्यांच्या निषेधार्थ वासिंद बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 03:01 AM2018-04-27T03:01:34+5:302018-04-27T03:01:34+5:30

यामुळे व्यापारी आणि रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

Wassind was closed for protesting against the thieves | चोऱ्यांच्या निषेधार्थ वासिंद बंद

चोऱ्यांच्या निषेधार्थ वासिंद बंद

Next

वासिंद : वासिंद बाजारपेठेत सातत्याने होत असलेल्या चोºयांच्या निषेधार्थ येथील व्यापारी मंडळाच्या वतीने बुधवारी वासिंद बंद पुकारण्यात आला. हा बंद १०० टक्के यशस्वी झाला आहे. वासिंद व्यापारी मंडळाच्या वतीने याबाबतचे निवेदन ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे.
वासिंदमधील सुदर्शन किराणा, राज बुटिक, वैभव जगे यांचे घर, माँजिनीस केक शॉप, शानू मोबाइल शॉप, राजेश्वर नॉव्हेल्टी आदी दुकानांत चोºया झाल्या आहेत. या चोºयांचा तपास होत नाही, तोवर सुनंदा शेलार या बँक आॅफ बडोदासमोरून जात असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ दुचाकीस्वारांनी खेचून पोबारा केला. गजानन काठोळे या शेतकºयाचे दोन बैल चोरीला गेले. दुकानफोडी, घरफोडी, चेनस्रॅचिंग, गाडीचोरी, मोबाइलचोरी अशा गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे व्यापारी आणि रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. यासंदर्भात व्यापारी मंडळाने ठाणे पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन पोलीस बंदोबस्तात वाढ करावी तसेच हॉटेल चक्र धारी आणि परिवार या एण्ट्री पॉइंटवर रात्री १२ नंतर चेकपोस्ट सुरू करावे. स्टेशन परिसरात रात्री संशयित प्रवाशांची चौकशी करावी, आदी मागण्या केल्या होत्या. परंतु, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले. यासंदर्भात व्यापारी मंडळाचे अध्यक्ष निलेश काठोळे यांनी सांगितले की, काही महिन्यांपासून वासिंदमध्ये चोºयांचे प्रमाण वाढले. तेव्हा ही बाब आम्ही पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. परंतु, पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. जेथे पोलिसांनी गस्त घालणे आवश्यक आहे, अशी काही ठिकाणेसुद्धा पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. तरीही, त्याकडे पोलिसांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले. परिणामी, चोºयांच्या प्रमाणात वाढ झाली. वासिंद परिसरातील व्यापारी आणि नागरिकांना अजिबात सुरक्षित वाटत नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हा बंदचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

Web Title: Wassind was closed for protesting against the thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Robberyदरोडा