शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

बळीराजाला दमदार पावसाची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 03:44 IST

जून महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी पाऊस सुरू न झाल्यामुळे भातबी पेरण्या लांबणीवर पडत असून पाऊस लांबल्यास भातपीक हंगाम धोक्यात येण्याची शक्यता असली तरी बळीराजा मात्र दरवर्षीप्रमाणे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत व आशेवर असून त्याचे डोळे आकाशाकडे आहेत.

- पंकज राऊतबोईसर  - जून महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी पाऊस सुरू न झाल्यामुळे भातबी पेरण्या लांबणीवर पडत असून पाऊस लांबल्यास भातपीक हंगाम धोक्यात येण्याची शक्यता असली तरी बळीराजा मात्र दरवर्षीप्रमाणे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत व आशेवर असून त्याचे डोळे आकाशाकडे आहेत.एप्रिल व मे महिन्यात शेतकरी मान्सूनपूर्व शेतीकामात व्यस्त होता दोन महिन्यात त्याने भातबी पेरणी नंतर भात बियांना पोषक अशी भुसभुशीत शेतजमीन मिळावी म्हणून शेतात राब पेटवून पेरणीपूर्वी व पेरणी नंतर लागणार्या सर्व साधन सामग्रीची जमवा जमव केली. त्यानंतर शेतकरी पावसाची वाट बघत आहे पालघर तालुक्यात चार महिन्यामध्ये साधारणपणे अडीच ते तीन हजार मि मी सरासरी पाऊस पडतो परंतु कधी वारेमाप, कधी टप्याटप्याने तर कधी दीर्घ विश्रांती घेऊन तो पडत असल्याने भातशेती म्हणजे आतबट्याचा व्यवहार होत आहे. त्यामुळे भात शेतीचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत चालले आहे.२०१६ साली बोईसर मंडळ क्षेत्रात २१ जूनला पावसाचे आगमन झाले होते त्या दिवशी १३ मि. मी . पाऊस झाला होता एवढा पाऊस उशिरा सुरू झाला त्या नंतर २४ जून पाऊस सुरू झाला होता संतत धार सुरूच राहून ६ जुलै पर्यंत १००० मि .मी. पाऊस झाला एकदम पाऊस कोसळलाल्या मुळे पेरण्या ही जुलै पर्यंत खोळंबून राहिल्या होत्या तर मागील वर्षी मागील वर्षी १० जूनपर्यंत बोईसर मंडळ क्षेत्रात ४०६.२ मि.मी. पाऊसाची नोंद झाली होती परंतु आज पर्यंत बोईसरला निरंक (0 मी. मि.) पाऊस म्हणजे सुरूच झाला नसल्याने शेतकरी चिंतातूर आहेत.पावसाअभावी शेतीची कामे रेंगाळलीविक्रमगड : जून महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी या तालुक्यात पावसाला सुरवात झालेली नाही. त्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहे शेतातील नागरणीची कामे झाली असली तरी पाऊस असता तर पेरणी करता आली असती असे मत शेतकरी रणधीर पाटील यांनी व्यक्त केले जसा पाऊस लाबणीवर जाईल तशी पेरणी व इतर शेतीची कामे लाबणीवर जाणार आहे तालुक्यात ८८५६ हेक्टर वर भात शेती केली जाते.यात मोठ्या प्रमाणात सुधारित बियाणांचा वापर शेतकरी करीत आहेत. त्यामध्ये सुवर्ण, राशी पूनम, महाबीज, जया, सुरती कोलम, गुजरात ११, इ भात बियाण्याची लागवड करतात , परंतु पावसाअभावी पेरणी लांबणीवर जाणार आहे. तालुक्यात पावसाळी पाण्यावर करण्यात येण्याऱ्या भातशेतीचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे तालुक्यात शेतकरी पावसाची वाट पाहत आहे . दरवर्षी पाऊस शेतकºयांना चकवा देतो. यंदा ही त्याने चकवा दिला आहे.वेधशाळेचा अंदाज हि त्याने फोल ठरविला आहे. मागील वर्षी पावसाने हजेरी जूनच्या पहिल्याच आठवडयात लावली होती. त्यामुळे पेरणी सुरू होती. यंदा पाऊस लांबणीवर गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. एकदा का पाऊस सुरू झाला की सर्व सुरळीत होईल. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असले तरी पाऊस चांगल्या प्रकारे पडेल असे मत तालुका कृषी अधिकारी दिलिप ढेंबरे यांनी सांगितले. पंचायत समिती मार्फत ५० टक्के अनुदानातून भात बियाणे दिले जाते. या वर्षी ही ते मिळावे अशी अपेक्षा आहे.तलासरीतील शेतकºयाचे पावसाकडे डोळेजिल्ह्यात काही ठिकाणी पावसाला सुरु वात झाली असली तरी तलासरी तालुक्यात पावसाने साधा शिडकावाही दिलेला नसल्याने येथील शेतकºयांचे आभाळाकडे डोळे लागले आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी दमदार पाऊस झाल्याने पेरण्यास सुरु वातही झाली आहे मात्र तलासरी भागात आभाळ भरून येते पावसाला सुरु वात होणारअसे वाटू लागताच ढग गायब होऊन कडक ऊन पडते , पावसाला सुरु वात होणार म्हणून शेतकºयांनी खते बी बियाणे खरेदी करु न ठेवले आहेत शेतकरी पेरणी साठी जय्यत तयारीत आहे पण पाऊस चकवा देतो आहे.तर जिल्ह्यातील भातशेती येईल संपुष्टात1,17,824 हेक्टर भौगोलिक क्षेत्रफळ पालघर तालुक्याचे असून त्या पैकी सुमारे १५ ते १६ हजार क्षेत्राफळा वर भात लागवड केली जात असून त्या मध्ये हळवे, गरवे व निमगरवे क्षेत्राचा समावेश असला तरी भातशेतीचे झपाट्याने घटणारे क्षेत्र हाचिंतेचा विषय असून शेतकºयांना प्रोत्साहन व बी बी-बियाणांपासून परवडणारे कर्ज उपलब्ध करून न दिल्यास भात शेती इतिहास जमा होण्यास वेळ लागणार नाही .मृग बरसल्याने बळीराजाची भात पेरणीसाठी लगबगपारोळ : वरुण राजा बरसल्याने वसईतील शेतकरी राबलेल्या शेतात पावसाच्या उबेवर तयार होणाºया पेरणीसाठी लगबग करू लागला आहे. यामुळे बळीराजा पेरणीसाठी लागणारे ट्रॅक्टर, बी, बियाणे, बीजकरणासाठी लागणारी औषधे, संकरित बियाणे यांची जुळवाजुळव करून घेत असून भागातील कृषी केंद्रांवर शेतकºयांची गर्दी दिसत आहे. चालू वर्षी बी बियाणे, खते, औषधे, औजारे यांच्या वाढलेल्या किमतीसह शेत नांगरणीसाठी लागणारे ट्रॅक्टर यांचे भाडे पॉवर टिलरला ताशी ३५० रु . तर मोठ्या ट्रॅक्टरचे ताशी भाडे ७५० रु इतके आहे.असे असले तरी वसईतील शेतकरी सुरवातीच्या पावसातील पेरण्या लवकर आटोपण्यासाठी लगबग करीत आहेत. कारण राबावरील पेरण्या पावसाच्या सुरवातीला उरकल्याने भात रोपात अनावश्यक उगवणाºया गवताचे प्रमाण अत्यंत कमी असते किंवा ते तयार होणाºया भात रोपपेक्षा खुजे असते . तसेच महिनाभर ऊन खाऊन तापलेल्या जमिनीची उब मिळून पेरलेल्या जास्तीत जास्त दाण्याची रोपे उगवतात व सशक्त होतात. तसेच योग्य वेळी लावणीसाठी तयार होतात.डहाणूत पेरण्यांचा पत्ताच नाहीबोर्डी : जूनचा दुसरा आठवडा उलटूनही तालुक्यात पावसाचे आगमन झालेले नाही. त्यामुळे अद्याप शेतकºयांनी भात आणि खरिपातील अन्य पिकांची पेरणी केलेली नसल्याने पेरणीचा तक्ता कोरा असल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयाकडून देण्यात आली.येत्या दोन-तीन दिवसात पाऊस न पडल्यास लावणीचा हंगाम लांबून, त्याचा परिणाम १२५ ते १४५ दिवसात तयार होणाºया भात पिकाच्या उत्पादनावर होईल अशी चिंता काही शेतकºयांनी व्यक्त केली. दरम्यान बोर्डी प्रमाणेच तालुक्यात दुबार पिके घेणाºया भागात धुळपेरणी करण्यात आली आहे. मात्र हे प्रमाण खूपच कमी आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीmonsoon 2018मान्सून 2018Vasai Virarवसई विरार