शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
4
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
5
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
6
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
7
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
8
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
9
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
10
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
11
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
12
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
13
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
14
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
15
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
16
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
17
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
18
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
19
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
20
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला

VVMC: महिलांसाठी खुशखबर! आता अर्ध्या भाड्यात करा बसनं प्रवास, वसई विरार महानगरपालिकेची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 15:15 IST

VVMC Bus Fare News: वसई-विरार महानगरपालिकेने येत्या १ जूनपासून महिलांना बस भाड्यात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला.

वसई-विरार महानगरपालिकेने येत्या १ जूनपासून महिलांना बस भाड्यात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. ही योजना राबविण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली, अशी माहिती वसई-विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी दिली. वसई-विरार महानगरपालिका अंतर्गत कूण १३० बस चालतात. यापैकी ९० बस कंत्राटदारांमार्फत चालवल्या जातात. तर, उर्वरित ४० बस महानगरपालिकेद्वारे चालवल्या जातात. या बस वसई-विरार परिसरातील ३७ प्रमुख मार्गांवर धावतात.

"काही इतर नागरी वाहतूक सेवा महिलांना तिकीट भाड्यात सवलत देत आहेत. महिलांना बसमध्ये ५० टक्के सवलत देण्याच्या राज्य सरकारच्या धोरणानुसार आम्ही १ जूनपासून महिलांना अर्ध्या दराने तिकिटे देण्याचा निर्णय घेतला आहे," असे अनिल कुमार पवार म्हणाले.

वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी अधिकारी आणि मंत्र्यांची भेट घेऊन आणि व्हीव्हीएमसी बसमध्ये महिलांना भाडे सवलत देण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. महानगरपालिकेच्या बसमधून प्रवास करताना महिलांना भाड्यात सवलत देणे, हे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या सवलतीचा फायदा या भागातील हजारो महिला प्रवाशांना होईल, ज्या दररोज काम, शिक्षण आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असतात. 

या उपक्रमामुळे केवळ आर्थिक दिलासा मिळणार नाही तर, महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल. स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी महानगरपालिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी अशी मागणी केली आहे, जेणेकरून सर्व पात्र महिलांना कोणत्याही अडथळ्याशिवाय त्याचा लाभ मिळू शकेल.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र