शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

विरार येथे तरुणाने घरातच केला मोत्यांच्या शेतीचा प्रयाेग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 1:02 AM

लाखोंची होते कमाई

सुनिल घरतलोकमत न्यूज नेटवर्क पारोळ : इच्छा, जिद्द आणि कष्ट करण्याची ताकद असेल तर माणूस काहीही करू शकतो. मग तो छोटामोठा व्यवसाय असो, भाजीची शेती असो वा मोत्यांची शेती असो. विरारमधील तरुणाने घरातच मोत्यांची शेती करून आज लाखो रुपयांची तो कमाई करत आहे. त्याने हा अनोखा व्यवसाय करून तरुणांपुढे नवा आदर्श ठेवला आहे. दागिन्यांची शोभा वाढवणारा मोती हा सर्वांनाच हवाहवासा वाटतो. हे शिंपल्यातील मोती केवळ समुद्रातच मिळतात, असा बहुतांश जणांचा समज आहे. विरारमध्ये राहणाऱ्या स्वप्निल साळवी या तरुणाने चक्क आपल्या घरातच मोत्यांची शेती केली आहे. या मोत्यांचा भाव प्रती नग ५०० ते २५०० रुपये असून वर्षाकाठी १०-१२ लाखांचे उत्पन्न घेतले जात आहे.विरारमध्ये राहणाऱ्या या तरुणाने गोड्या पाण्यातील मोती पालन शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. शेतात काम करून काहीही हाती लागत नाही, अशी अनेकांची ओरड असते. पण या शेतीच्या प्रयोगने ती ओरड चुकीची ठरवली आहे. एका सामान्य कुटुंबातील स्वप्निल हा हॉटेल व्यवसायात होता. खूप मेहनत करूनही हवे ते उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे काहीतरी वेगळे करण्याचा विचार त्याच्या डोक्यात आला. त्यानुसार चक्क घरातच मोत्यांची शेती करण्याचा अभिनव प्रयोग यशस्वीरीत्या प्रत्यक्षात आणला आहे. पारंपरिक गोल मोत्यांसह 'डिझायनर' मोत्यांची निर्मिती करून त्यांची ५०० रुपयांपासून ते अडीच हजार रुपयांपर्यंत विक्री होत आहे.प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या मोत्यांच्या शेतीतून स्वप्निलला वर्षांकाठी ८ ते १२ लाख उत्पन्न मिळत आहे. मोत्याची मागणी मार्केटमध्ये खूप जास्त आहे. विशेष म्हणजे ही शेती देशातील कोणत्याही भागात केली जाऊ शकते, अशी ही शेती आहे. सुरू करण्यापूर्वी ट्रेनिंग घेणे गरजेचे आहे. त्यानुसार स्वप्नीलने सीआयएफए म्हणजेच सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर एक्वाॅकल्चर नावाची एक संस्था आहे, जी शिंपल्याची शेती करण्याचे प्रशिक्षण देते. तेथे या व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर दाेन वर्षे यावर संशाेधन केले व घरातच  मोत्यांची शेती केली. एखादा व्यवसाय मन लावून केला तर त्यात यश हे नक्की मिळते, हेच वाक्य स्वप्निलने सार्थ केले आहे. मोत्याच्या शेतीचे तंत्र हे स्वतः पुरते मर्यादित न ठेवता  इतर तरुण व शेतकऱ्यांनाही ताे या शेतीबाबत मार्गदर्शन करत आहे. तरुणांनीया क्षेत्राकडे वळावे कारण मोत्यांची शेती ही लाखमोलाची ठरू शकते, असे स्वप्निल याने सांगितले.