शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Virar: सराईत आरोपीकडे सापडले दोन लाखांचे अंमली पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 17:45 IST

Crime News: सराईत आरोपीकडे सोमवारी दुपारी दोन लाख रुपये किंमतीचे ब्राऊन शुगर आणि गांजा असे अंमली पदार्थ सापडले आहे. विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी कामगिरी केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी दिली आहे.

 - मंगेश कराळे  

नालासोपारा - सराईत आरोपीकडे सोमवारी दुपारी दोन लाख रुपये किंमतीचे ब्राऊन शुगर आणि गांजा असे अंमली पदार्थ सापडले आहे. विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी कामगिरी केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी दिली आहे.

विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे यांना एक आरोपी सोमवारी दुपारी कारगिल नगरच्या कालिका माता मंदिराजवळ ब्राऊन शुगर आणि गांजा विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.  

सदर बातमीचे आधारे मिळालेले बातमीची माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेले आदेशान्वये लागलीच सदर ठिकाणी सापळा रचुन आरोपीला शिताफिने ताब्यात घेतले. राहुल ओबांसे असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीची अंगझडती घेतल्यावर त्याचे कब्जात १७ ग्रॅम वजनाचा १ लाख ७० हजार  रुपये किंमतीचा ब्राऊन शुगर नावाचा अंमली पदार्थ व १ किलो ५०० ग्रॅम वजनाचा ३० हजार रुपये किंमतीचा गांजा असा एकुण २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापार परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क), २१(ब), २०(ब) त्त्(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केले आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अभिजित मडके व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, विशाल लोहार, इंद्रनिल पाटील, संदिप शेरमाळे, योगेश नागरे, संदिप शेळके, मोहसिन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, प्रफुल सोनार यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार