शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
3
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
4
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
5
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
7
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
8
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
9
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
10
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
11
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
12
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
13
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
14
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
15
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
17
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
18
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
19
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
20
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी

विरार म्हाडा मैदानात क्रीडासंकुल साकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 11:21 PM

३० कोटींची तरतूद : १८ महिन्यांत काम पूर्ण

वसई : पालघर जिल्ह्यातील खेळाडूंना चांगल्या क्रीडा सोयी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विरार येथील म्हाडा मैदान येथे अद्यावत क्रीडा संकुल बनविण्यात येत आहे. या संकुलासह नविन क्रीडांगणासाठी स्टेडियम बांधकाम व इतर कामांसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात 30 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. सध्या या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. पुढील ४२ महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.

ठाणे जिल्ह्यातून विभाजन करण्यात येऊन नवीन पालघर जिल्हा निर्माण करण्यात आला. या जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल नसल्यामुळे अद्यावत क्रीडा संकुल बनविण्यात यावे, जेणेकरून येथील खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकतील अशी मागणी करण्यात येत होती. याबाबत या खेळाडूंसाठी विरार येथील म्हाडाच्या जागेत हे क्रीडा संकुल उभारण्यात येण्यात यावे, असा प्रस्ताव आमदारांच्यावतीने सादर करण्यात आला होता. म्हाडाची जमीन पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आल्यानंतर दि. २६ नोव्हेंबर २०१७ रोजी भूमिपूजन सोहळा झाला होता. या संकुलात ओलिंपिक साईज तरण तलाव, ४00 मिटरचा सिंथेटीक रिनंग ट्रॅक,लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, हातोडाफेक, फुटबॉल इत्यादि खेळांच्या सुविधांसह बास्केटबॉल, बैडमिंटन, टेबलटेनिस या खेळांबरोबरच मार्शल आर्ट ,योगाभ्यास यासाठी इनडोअर सुविधा असतील. 

विरार येथील म्हाडा वसाहतीनजीक हे क्रीडा संकुल बनविण्यात येत असून , सात एकरमध्ये मैदानी व बंदिस्त खेळासाठी अद्यावत सुविधा असणार आहे. क्रीडा संकुलाचे काम प्रगतिपथावर आहे.- सुदेश चौधरी,स्थायी समिती सभापतीक्रीडा संकुलाच्या कामासाठी कार्यादेश काढून आठ महिने झाले आहेत.काम सुरू असून ४२ महिन्यात काम पूर्ण होईल.- राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता वसई विरार महानगरपालिका