शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विरार, नालासोपारा पोलिसांच्या जागेवर बेकायदा इमारती, कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 02:23 IST

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात वसई विरार परिसरातील आदिवासीनंतर आता पोलिसांचे भूखंड भूमाफियांनी लाटल्याचा प्रकार उजेडात आला आहे. विरार आणि नालासोपारा येथील भूखंड लाटून त्याठिकाणी बेकायदा इमारती बांधून बोगस कागदपत्रांच्या द्वारे सदनिकांची विक्री केल्याचे उजेडात आले असून मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशी करून संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

शशी करपे।वसई : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात वसई विरार परिसरातील आदिवासीनंतर आता पोलिसांचे भूखंड भूमाफियांनी लाटल्याचा प्रकार उजेडात आला आहे. विरार आणि नालासोपारा येथील भूखंड लाटून त्याठिकाणी बेकायदा इमारती बांधून बोगस कागदपत्रांच्या द्वारे सदनिकांची विक्री केल्याचे उजेडात आले असून मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशी करून संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.विरार पूर्वेला पोलिसांसाठी भूखंड राखीव असून त्याठिकाणी पोलीस वसाहत आहे. याठिकाणी वसई वसाहत आणि उपविभागीय पोलीस कार्यालय बांधण्यास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. मात्र, या भूखंडातील जागा भूमाफियांनी बळकावून त्याठिकाणी अनधिकृत इमारती बांधून बोगस कागदपत्रांच्या द्वारे सदनिकांची विक्री आहे.या जागेची मोजणी करण्यात आली असता भूमी अभिलेख कार्यालयाने साधी मोजणी करून फक्त हद्द कायम दाखवलेली आहे.दुसरीकडे, नालासोपारा येथील समेळ सर्व्हे नंबर ४९, हिस्सा नंबर ८/४ या पोलिसांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर अतिक्रमण भूमाफियांनी बेकायदा इमारती बांधल्या आहेत. याही ठिकाणी बिल्डरांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे सदनिकांची विक्री करून ग्राहक आणि वित्तिय संस्थांची फसवणुक केली आहे. याप्रकरणी आनंद ठाकूर यांनी विधीमंडळात प्रश्न उपस्थित केल्यानंतर महापालिकेने घाईघाईत संबंधित बिल्डरांविरोधात एमआरटीपी अ‍ॅक्टखाली गुन्हे नोंदवले आहेत. सदर इमारतींना महापालिकेने बांधकाम परवानगी अथवा भोगवटा प्रमाणपत्र दिलेले नाही. मात्र, विकासकाने बनावट कागदपत्रांद्वारे दुय्यम निबंधकांकडे दस्त नोंदणी केल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे महापालिकेने राज्य सरकारला कळवले आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिसVasai Virarवसई विरार