शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
3
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
4
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
7
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
8
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
9
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
10
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
11
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
12
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
13
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
14
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
15
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
16
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
17
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
18
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
19
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
20
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

Virar Covid Hospital Fire: ...अन् १३ रुग्ण घुसमटून, होरपळून मृत्यूमुखी पडले; कालच लागली होती दुर्घटनेची चाहूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 09:03 IST

Virar Covid Hospital Fire: विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू; नातेवाईकांचे रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप

विरार: विरारच्या कोविड हॉस्पिटलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. हॉस्पिटलला लागलेल्या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. विजय वल्लभ रुग्णालयातील आयसीयूचा रात्री ३.१५ च्या सुमारास स्फोट झाला. यावेळी एकूण १७ जण आयसीयूमध्ये उपचार घेत होते. आगीची घटना घडताच आयसीयूच्या दरवाज्याजवळ असलेल्या ४ रुग्णांनी तिथून पळ काढला. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. या चारपैकी दोन रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.दुर्घटनेची माहिती मिळताच रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. संपूर्ण परिसरात आक्रोश ऐकू येत होता. आपल्या कुटुंबातील सदस्य बरा होऊन परतेल अशी आशा अनेकांना होती. मात्र आपल्या जीवाभावाची व्यक्ती हिरावल्यानं अनेकांनी हंबरडा फोडला. आपल्या जवळच्या व्यक्ती गमावणाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनानं गंभीर आरोप केले आहेत. ज्यावेळी दुर्घटना घडली, त्यावेळी तिथे कर्मचाऱ्यांपैकी कोणीही नव्हती, असा दावा रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. कर्मचारी आयसीयूमध्ये उपस्थित असते, तर इतक्या रुग्णांचे प्राण गेले नसते, अशा प्रतिक्रिया नातेवाईकांकडून उमटत आहेत.मोठी दुर्घटना! विरारच्या कोविड रुग्णालयात भीषण आग; 13 रुग्णांचा होरपळून मृत्यूरुग्णालयात लागलेल्या आगीत एकूण १३ जणांचा मृत्यू झाला. ४३ वर्षांच्या सुप्रिया देशमुख या मृतापैकीच एक. त्यांची बहिण काल त्यांना भेटण्यासाठी गेली होती. 'मी वैद्यकीय कर्मचारी आहे. काल मी माझ्या बहिणीसाठी पेज घेऊन गेले होते. तेव्हा आयसीयूमधील एसीमध्ये बिघाड झाला होता. एक कर्मचारी एसीचा फ्लॅप उघडून बघत होता. एसी वर्किंग नसताना ज्याप्रकारचा वास येतो, तसा वास त्यावेळी येत होता आणि रुग्णांसाठी पंखे लावण्यात आले होते. या दुर्घटनेची माहिती मला बाजूच्या बेडवर असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून समजली. त्यांनी मला रात्री कॉल केला होता,' असं देशमुख यांच्या बहिणीनं सांगितलं.रुग्णालयातील दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासावर अनेक आरोप केले आहेत. रुग्ण दाखल करून घेताना आमच्याकडून तातडीनं ५० हजार रुपये घेण्यात आले. एका तासात पैशांची व्यवस्था करायला लावली. मात्र ज्यावेळी दुर्घटना घडली, तेव्हा आयसीयूमध्ये एकही कर्मचारी नव्हता, असा आरोप एका नातेवाईकानं केला. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्या