शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी सोडविला पाणीप्रश्न, इतरांसाठी निर्माण केला आगळावेगळा आादर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 03:22 IST

विक्रमगड तालुक्यात सध्या पाणीटंचाईने तीव्र रूप धारण केले आहे. तालुक्यात दर वर्षी त्याच त्याच गाव-पाड्याना पाणीटंचाई जाणवत आहे.

- राहुल वाडेकर तलवाडा : विक्रमगड तालुक्यात सध्या पाणीटंचाईने तीव्र रूप धारण केले आहे. तालुक्यात दर वर्षी त्याच त्याच गाव-पाड्याना पाणीटंचाई जाणवत आहे. शासनाकडून या पाणी टंचाईवर कायम स्वरूपाची उपययोजना करण्या ऐवजी टँकरने पाणीपुरवठा करून तात्पुरती मलम पट्टी केली जात आहे. तालुक्यातील खुडेद म्हसेपाडाची लोकसंख्या २०० ते ३०० च्या दरम्यान आहे. येथे एकच बोअरवेल आहे या बोअरवेल वरुनच म्हसेपाडा, घोडीचापाडा या दोन पाड्यातील नागरीकाना पाणी भरावे लागत असल्याने या पाडयांना दरवर्षी एप्रिल, मे, जून ह्या महिन्यांमध्ये पाणी टंचाईचा फटका बसत असतो. शासनाकडून या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने गावकऱ्यांनी एकत्र येऊन सावली चॅरीटेबल ट्रस्ट, मुंबईच्या मदतीने श्रमदानातून जुन्या विहिरीतील १५ ते २० फूट गाळ काढून ती पुनर्जीवित केली व पाड्यातील पाणी टंचाईवर कायम स्वरु पात मात केली आहे.गावाने ठरवले तर पाणी टंचाईवर कायम स्वरूपाची मात कशी होऊ शकते याचा व गाव करील ते राव काय करील? या म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.या गाव शिवारात कुठलेही धरण, तलाव किवा बंधारा नाही. हा भाग डोंगर-दºयांत वसलेला आहे. यामुळे या भागाला दर वर्षी पाणी टंचाईचा फटका बसत असतो. पाणी टंचाई सुरु झाली की पायपीट करत महिलाना पाणी भरावे लागत होते या पाणी टंचाई वर मात करण्यासाठी पाड्यातील नागरिकांनी एकत्र येऊन पाड्यात एकमेव असलेली आणि गाळाने खचाखच भरलेल्या विहिरीतील १५ ते २० फूट गाळ ८ ते १० दिवसांच्या श्रमदानाने काढला.त्याना साथ दिली ती मुंबई येथील सावली चेरीटेबल ट्रस्टने.आमचा पाड्याला दरवर्षी पाणी टंचाई जाणवत होती. त्यामुळे मे महिन्यात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. असे असातांना आम्हला सावली चेरीटेबल ट्रस्ट, मुंबई याच्या सहकार्याने विहिरीतील गाळ काढण्यास मदत झाली. त्यामुळे पाड्याचा पाणी टंचाईचा प्रश्न कायम स्वरूपी सुटणार आहे. -पिंटी सुभाष गांगोडा, महिला, खुडेद पैकी म्हसेपाडाआमचा पाडा उंच भागात आहे. त्यामुळे पाणी टंचाई आहे. गावात एकमेव बोअरवेल असून ती वरूनच घोडिचापाडा व म्हसेपाडा या दोन पाड्यातील महिला पाणी भरतात. त्यामुळे पाणी टंचाई जाणवत होती. त्यातच एकमेव विहिरीत गाळ साचल्याने पाण्याला दुर्गंधी येत होती. ग्रामस्थांच्या सहकार्यातून गाळ काढल्याने पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सुटला आहे. -लहू नडगे, ग्रामस्थ, खुडेद>गावकरीही सोडवू शकतात प्रश्नया दोन पाडयातीत पाणी टंचाईमुळे होणारी महिलाची पायपीट कायम स्वरूपाची थांबणार असून या पाड्याने श्रमदानातून कायम स्वरूपाची पाणी टंचाईवर मात केली आहे.त्यामुळे ग्रामस्थांमधे आनंदाचे वातावरण आहे . यापुढे गावात पाणीटंचाई दूर होणार असून ग्रामस्थ व गुरेढोरे यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम सुटल्याने ग्रमस्थानी समाधान व्यक्त केले.आपल्या गावपाड्याचा प्रत्येक प्रश्न शासनानेच सोडवावा असे नाही.त्यासाठी आपणही पुढाकार घेऊन विधायक काम करू शकतो, याचा उत्तम आदर्श या गावाने इतरांसाठी निर्माण केला आहे.