शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

झाडे तोडण्यास ग्रामस्थांचा विरोध; जलवाहिन्या टाकण्याचे काम थांबले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 00:45 IST

वन अधिकाऱ्यांना हुसकावले

कासा : वसई -विरार, मीरा - भाईंदर महापालिकेसाठी सूर्या प्रकल्पातील धामणी, कवडास धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी एमएमआरडीए पाणीपुरवठा योजना राबवित आहे. यायासाठी जलवाहिन्या टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, वनपट्ट्यातून जाणाºया जलवाहिन्यांसाठी झाडे तोडण्यासाठी वेती ग्रामस्थांनी प्रखर विरोध केला आहे. त्यामुळे प्रस्तावित जागेवर पोलीस बंदोबस्तात झाडे तोडण्यासाठी एमएमआरडीए आणि वन अधिकारी गेले असता ग्रामस्थांच्या विरोधापुढे त्यांना माघार घ्यावी लागली.

४०३ दशलक्ष ली. प्रतिदिन पाणीपुरवठा योजना मीरा - भार्इंदर तसेच वसई - विरार आणि परिसरासाठी राबविली जात आहे. पण या योजनेसाठी वेती तसेच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी वनहक्क समितीच्या माध्यमातून आंदोलन करून, मोर्चा काढून त्यास प्रखर विरोध दर्शविल्याने हे काम रखडले आहे. एमएमआरडीए प्रकल्पाला ग्रामपंचायत, वनहक्क समिती तसेच सूर्या पाणी बचाव समितीचाही विरोध आहे.

वेती गावातील वनपट्ट्यांतील प्रस्तावित जागेतून ही जलवाहिनी जात असल्याने तेथील झाडे तोडण्याच्या कामासाठी, होणारा विरोध लक्षात घेत पोलीस बंदोबस्तात वनविभागाचे अधिकारी दोन दिवसांपूर्वी झाडे तोडणार होते. परंतु, वेती येथील ग्रामस्थांनी झाडांना विळखा घातल्याने आलेल्या अधिकाऱ्यांना माघारी जावे लागले. डहाणूतील पर्यावरण संरक्षण समितीची परवानगी नसल्याने हा प्रकल्प राबवू दिला जाणार नाही असे वनहक्क समितीचे म्हणणे आहे.

आम्ही मागच्या महिन्यात कासा पोलीस ठाण्यात या पाणी पुरवठा योजनेला, आणि वनपट्ट्यात फेरफार केलेल्या अधिकाºयांविरोधात तक्रारी केल्या आहेत. पण कोणतीही कारवाई झाली नाही, आमचा या प्रकल्पाला विरोध राहील.- प्रकाश हाडळ, वनहक्क समिती अध्यक्ष, वेती

वन अधिकाऱ्यांनी या झाडे तोडण्याच्या कामासाठी बंदोबस्त मागितला होता. तो आम्ही दिला पण ग्रामस्थांनी केलेल्या विरोधामुळे अधिकाऱ्यांना परत जावे लागले.- आनंदराव काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस कासा

टॅग्स :environmentपर्यावरणforest departmentवनविभागVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र