शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर विजय मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी घेतले स्वत:लाच कोंडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 02:03 IST

तहसीलदार सुनील शिंदे यांनी तालुक्यातील बोईसरमध्ये ३४ वर्षीय बाधित रुग्ण सापडल्याने बोईसरसह अन्य १४ गावे यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत.

पालघर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाच्या संसर्गाचा प्रभाव हळूहळू वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर सातपाटी, नवापूर, सरावली या गावांतील ग्रामस्थांनी स्वत:ला ४ ते ५ दिवस कोंडून घेण्याचा सामूहिक निर्णय घेतला आहे. तहसीलदार सुनील शिंदे यांनी तालुक्यातील बोईसरमध्ये ३४ वर्षीय बाधित रुग्ण सापडल्याने बोईसरसह अन्य १४ गावे यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत.वाढता प्रादुर्भाव रोखला जावा, यासाठी तहसीलदार शिंदे यांनी सफाळेसह उसरणी, दांडा-खटाळी, डोंगरी व उंबरपाडा, कर्दळ आदी सहा गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली आहेत. सध्या संबंधित गावांवर आपल्या आरोग्य टीमसह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी लक्ष ठेवून आहेत.सातपाटी येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर या संशयित रुग्णाच्या घशाचे स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले. या पार्श्वभूमीवर सरपंच व ग्रामसेवकांनी २८ ते ३० एप्रिलपर्यंत सातपाटी गाव कडकडीत बंद ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.यापूर्वी तालुक्यातील मासवणजवळील काटाळे येथील एका विटभट्टीवर डहाणूच्या गंजाडमधील कामावर असलेल्या कुटुंबातील एक तीन वर्षीय मुलगी कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार शिंदे यांनी काटाळे, लोवरे, वसरोली, वांदिवली, खरशेत, निहे, मासवण, वाकडी ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली होती. तर सफाळे (उसरणी) येथे तालुक्यातील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या पत्नीसह मुलगी, आई-वडील अन्य नातेवाईकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. यानंतर १५ एप्रिल रोजी सफाळ्याच्या कर्दळ जवळील एक तरुण, उसरणी येथून ११ वर्षीय मुलगी व ४० वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.>तीन ते पाच दिवसांसाठी गावे बंदबोईसरमध्ये एका ३४ वर्षीय तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने २७ एप्रिल ते १ मे पर्यंत बोईसर कडकडीत बंद ठेवण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीने घोषित केले आहे. तहसीलदार शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण बोईसर हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर लगतच्या सरावली व नवापूर ग्रामपंचायतींनी आपली गावे तीन ते पाच दिवसांसाठी बंद घोषित करीत कोरोनाला हरविण्यासाठी स्वत:ला घरातच कोंडून घेण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस