शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक; ७ रिक्षा, १ दुचाकी, १ मोबाईल हस्तगत, ८ गुन्हे उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 15:54 IST

५ जूनला रात्री गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार हे नालासोपारा पूर्वेकडील फारब्रिगेड नाका येथे गस्त करत होते.

मंगेश कराळे

नालासोपारा :- वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात आचोळे पोलिसांना यश मिळाले आहे. या आरोपीकडून चोरीच्या ७ रिक्षा, १ दुचाकी आणि १ मोबाईल असा एकूण ५ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करत ८ गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी सोमवारी दिली आहे.

एव्हरशाईन सिटी येथील इंद्रपुरम रेसॉर्ट अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या धर्मेंद्र कनोजिया (३४) यांची रिक्षा चोरीला गेली होती. ३० मे रोजी रात्री विनाडायनास्टी सोसायटीच्या बाहेर मोकळ्या जागेत पार्किंग केलेली रिक्षा चोरीला गेली होती. आचोळे पोलिसांनी ४ जून रोजी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात रिक्षा चोरीच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठांनी गुन्ह्यांची उकल करून आरोपींना अटक करण्याचे आदेश आचोळे पोलिसांना दिले होते. दिलेल्या सूचना व आदेशान्वये आचोळे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषनाद्वारे व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत होते.

५ जूनला रात्री गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार हे नालासोपारा पूर्वेकडील फारब्रिगेड नाका येथे गस्त करत होते. त्यावेळी एक संशयित चोरी झालेली रिक्षा चालवून जाताना दिसला. त्या रिक्षाचा पोलिसांनी पाठलाग करून संशयिताला ताब्यात घेतले. त्याला या रिक्षाबद्दल विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर पोलिसांनी त्याला आचोळे पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्याने शशिकांत कामनोर (२४) असे नाव सांगितले. त्याच्याकडून चोरीची ही रिक्षा जप्त केली. पोलीस कस्टडीमध्ये तपास व सखोल चौकशी करून आरोपीकडून चोरीच्या ७ रिक्षा, १ दुचाकी आणि १ मोबाईल असा एकूण ५ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करत ८ गुन्ह्यांची उकल केली आहे. यापूर्वीही आरोपीवर ७ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आचोळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार पवार, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि यशपाल सुर्यवंशी, पोउनि मंगेश वडणे, सफौ दत्तात्रय दाईंगडे, पोहवा शंकर शिंदे, निखील चव्हाण, विनायक कचरे, आमोल सांगळे, मोहनदास बंडगर, गोविंद गट्टे आणि अमोल बरडे नेम. पोलीस उप आयुक्त कार्यालय परिमंलड वसई यांनी केली आहे.