वाहनतळ योजना कागदावरच, वसई-विरारमध्ये पार्किंगसाठी शोधाशोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:05 AM2019-12-24T00:05:15+5:302019-12-24T00:05:29+5:30

वसई-विरारमध्ये पार्किंगसाठी शोधाशोध : दुतर्फा वाहने उभी केल्यामुळे रहदारीला अडथळा

On the Vehicle Planning Paper, search for parking in Vasai-Virar | वाहनतळ योजना कागदावरच, वसई-विरारमध्ये पार्किंगसाठी शोधाशोध

वाहनतळ योजना कागदावरच, वसई-विरारमध्ये पार्किंगसाठी शोधाशोध

Next

आशीष राणे 

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांच्या कडेला अथवा गल्लोगल्लीत छोट्या- मोठ्या रस्त्यांवरदेखील दोन्ही बाजूंनी वाहने उभी केल्यामुळे तेथील रहदारीला अडथळा तसेच या ठिकाणी वाहतूककोंडी होत असल्याच्या अनेक तक्रारी महानगरपालिकेला वारंवार प्राप्त होत आहेत. यावर उपाय म्हणून बहुमजली वाहनतळ योजना आखण्याची घोषणा मध्यंतरी पालिकेने केली होती, परंतु ही योजना अद्याप कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेचे आयुक्त बी. जी. पवार यांनी वसई-विरार शहरात भेडसावणाऱ्या पार्किंग प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याला प्राधान्य दिले पाहिजे, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. मधल्या काळात नारायण मानकर हे महापौरपदी असताना त्यांनी वसई रोड नवघर येथे पहिले बहुमजली वाहनतळ (मल्टिस्टोरेड पार्किंग) उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबत पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली होती. पुढे याबाबत निविदा प्रक्रिया राबवून हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी आणला होता. मात्र या पार्किंग निविदेचे घोडे कुठे अडले हेच कळले नाही. त्यामुळे आज शहरातील पार्किंगची बिकट समस्या पाहता लागलीच प्रशासनाने या मल्टीस्टोरेड पार्किंगबाबत युद्धपातळीवर निर्णय घेतला नाही तर समस्या मोठी बिकट होईल, असे चित्र वसई-विरारमध्ये आहे.
यापूर्वी अनेकदा वसई रोड, नालासोपारा आणि विरार येथे वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने महापालिका क्षेत्रात वनसाइड पार्किंग, वन वे-टू वे वाहतूक, नो पार्किंग झोन अशा विविध प्रकारे पार्किंगचे नियोजन केले जायचे तर ठिकठिकाणी नो पार्किंगचे सूचना फलकही लावले आहेत. त्यातच नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे ही आपली सामाजिक जबाबदारी मानून सहकार्य करण्याचे आवाहन देखील महापालिकेच्या वतीने नागरिकांना सातत्याने करण्यात येते, परंतु नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद लाभत नसल्याचे वाहतूक पोलीस व महापालिकेचे म्हणणे आहे.

बेवारस वाहनांना नोटिसा बजावल्या पण...
च्याशिवाय महापालिका हद्दीमध्ये अनेक बेवारस वाहने रस्त्यांवर पडून आहेत. अथवा कितीतरी वाहने अनेक महिने, वर्षे रस्त्यांवर उभी आहेत. अशा वाहनांच्या मालकांना महापालिकेने नोटिसाही बजावल्या आहेत. मात्र तरीही रस्त्यांवर वाहने उभी असल्याचे दिसत आहे.याशिवाय बºयाचदा रस्त्यांवर ट्रक, कंटेनर, स्कूल बसेसची पार्किंग होत असल्याने वाहतूककोंडी होऊन रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.

च्वसईचा नवघर भाग, आनंदनगर, साईनगर, अंबाडी रोड, स्टेला, पार्वती क्रॉस, पंडित दीनदयाळ नगर, ओमनगर, माणिकपूर मुख्य नाका आणि खासकरून पश्चिम रेल्वेच्या स्टेशनांवरील पूर्व-पश्चिम जागेत दररोज मोठी वाहतूककोंडी होत असते.

च्शहरांत सध्या अनेक ठिकाणी रस्त्यांवर अनधिकृत गॅरेज सुरू दिसतात. त्यामुळे प्रचंड कोंडी होत असते. शिवाय तेथे पंक्चरचे पाणी, प्लास्टिक रॅपरचा कचरा तसाच टाकला जात असल्याने मोठ्या प्रमाणावर अस्वच्छताही पसरते. गॅरेजचालकांकडून वाहन दुरुस्तीसाठी करण्यात येणारा रस्त्याचा वापर त्वरित थांबवावा अन्यथा त्यांच्याकडून दंडात्मक रक्कम वसूल करून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

Web Title: On the Vehicle Planning Paper, search for parking in Vasai-Virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.