शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
4
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
5
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
6
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
7
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
9
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
10
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
11
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
12
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
13
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
14
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
15
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
16
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
17
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
19
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
20
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?

वसईत भातकापणी सुरू, मजुरांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:11 IST

तालुक्यात २०० ते २५० हेक्टरमध्ये भातपीक; उडवी रचणे, झोडणी करण्यास झाला प्रारंभ

नालासोपारा : वसई तालुक्यात भाताचे पीक यंदा समाधानकारक आल्याने येथील बळीराजा सुखावला आहे. मात्र तयार झालेल्या भाताच्या ओंब्यांवर काही ठीकाणी कीड तर काही प्रमाणात करपाची लक्षणे दिसून येत होती. पण तरीही या रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्याचे आढळून आले नाही.गेल्या महिन्यापासून निसवण्याच्या स्थितीत असलेल्या भातपिकाची कापणी सद्या सुरू झाली आहे. वसईच्या पश्चिम पट्ट्यातील ग्रामीण भागात आगाशी, उमराळे, गास, नाळा या गावांतील शेतकरी सध्या कापणीच्या तयारीत व्यस्त झाले आहेत.भात हे वसईच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. परंतु वाढत्या शहरीकरणामुळे वसईची शेती संपुष्टात येऊ लागली आहे. अजूनही वसईच्या पश्चिम पट्टयातील गावांत काही प्रमाणात भातशेती होत आहे. आषाढ महिन्यात भातपेरणी होते आणि अश्विन महिन्यात कापणीला सुरूवात होते. भातशेतीसारख्या कष्टप्रद व्यवसायात मनुष्यबळाचा जाणवणारा तुटवडा, त्यातच वाढलेली रोजंदारी यामुळे शेतकरी आपल्या कुटूंबासह कापणी, झोडणी व उडबी रचण्यात मग्न आहे.पूर्वपट्टीतही हळवा भाताच्या कापण्यांना सुरुवाततालुक्याचा पूर्व भाग हा डोंगरदºयाचा आहे. या जमिनीत पावसाचे पाणी न साचता ओलावा धरून राहत असतो. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ९० दिवसांचे पीक घेण्यात येते.रोग असला तरी हे पीक कापणीस तयार झाले आहे. वसई तालुक्यात चालू वर्षी चांगल्या झालेल्या पावसामुळे ९० ते १०० दिवसात तयार होणारे मध्यम जमिनीतील निम गरवे पीक व १०० ते १२० दिवसात तयार होणारे पाणथळ जमिनीतील गरवे पीक हे चांगल्या जोमाने तयार होते.उडबी रचणे व भातपिकांची झोडणी...शेतात भाताचे तयार झालेले पीक कापल्यानंतर दोन ते तीन दिवस उन्हात पसरवून ठेवले जाते.त्यानंतर त्याचे झोडणीसाठी छोटे भारे बनविले जातात.काही ठिकाणी हे भारे ठेवण्यासाठी विशिष्ट पद्धताने उडंबे गोलाकार बनवले जातात. हे उडबे शेतकरी झोडणी करणार असलेल्या शेतात कींवा आपल्या घराशेजारच्या मोकळ्या जागी शेणाने जमीन सारवून करतात. लाकडी टेबल किंवा ओंडक्यावर झोडणी केली जाते. काही ठीकाणी हल्ली यंत्राच्या साहाय्यानेही झोडणी होते.

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरार