शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वसई : महिलेला अश्लील मेसेज पाठवणा-या गायकाला महिलांनी भररस्त्यात दिला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 01:12 IST

सामाजिक कार्यकर्ता असलेल्या एका महिलेच्या मोबाईलवर अश्लील मॅसेज पाठवून भेटायला बोलावणा-या एका गायकाला महिलांनी भररस्त्यात चांगलाच चोप देऊन तुळींज पोलिसांच्या हवाली केले.

वसई : सामाजिक कार्यकर्ता असलेल्या एका महिलेच्या मोबाईलवर अश्लील मॅसेज पाठवून भेटायला बोलावणा-या एका कथित भोजपुरी गायकाला महिलांनी भररस्त्यात चांगलाच चोप देऊन तुळींज पोलिसांच्या हवाली केले.पीडित महिलेची ओळख असलेल्या भोजपुरी गायक पिंटू सिंग याने त्याचा शाळा प्रवेशाचे काम असल्याचे कारण सांगून मोबाईल नंबर घेतला होता. मात्र, गे्ल्या दहा-बारा दिवसांपासून तो रात्री-अपरात्री त्यांना व्हॉटसअ‍ॅपवर मॅसेज पाठवून सतावत होता. महिलेने कामासाठी त्याच्याशी व्हॉटसअ‍ॅपवर बोलणे केल्यानंतर त्याने अश्लील गाणी, फोटो, मॅसेज पाठवायला सुरुवात केली. तसेच तो त्यांना भेटण्यासाठी बोलावू लागला.या प्रकाराने हैराण झालेल्या या महिलेने काही महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांना सोबत घेऊन बुधवारी त्याला दुपारी भेटायची वेळ दिली. ओसवाल नगरी येथे भेट झाल्यावर तो त्यांना हॉटेलमध्ये येण्याचा आग्रह करू लागला. त्यामुळे संतापलेल्या महिलेने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यासरशी सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्याची यथेच्छ धुलाई केली. त्यानंतर त्याला तुळींज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.आरोपी विकृत्त प्रवृत्तीचा असून एकतर्फी प्रेमातून त्याने हे कृत्य केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.व्हॉटसअ‍ॅपवर अश्लील मॅसेज पाठवून मानसिक त्रास देणाºया आणि छेडछाड करणा-या विकृतांना धडा शिकवला तर असे प्रकार घडणार नाहीत. महिलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होणार नाही, असे पीडित महिलेने सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrimeगुन्हाPoliceपोलिस