शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

वसई, नालासोपाऱ्यामधील कमी मतदानाचा फायदा कुणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:05 PM

पालघर लोकसभा मतदार संघात २९ एप्रिल रोजी मतदान शांततेत पार पडले. सरासरी ६१.३६ टक्के मतदान झाले असून निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण १२ उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम) सीलबंद झाले

पालघर : पालघर लोकसभा मतदार संघात २९ एप्रिल रोजी मतदान शांततेत पार पडले. सरासरी ६१.३६ टक्के मतदान झाले असून निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण १२ उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम) सीलबंद झाले.जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान प्रक्रि या पार पडली असून २३ मे रोजी मतमोजणी होऊन उमेदवाराच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

या लोकसभा मतदार संघात आज सकाळच्या पहिल्या तासात मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळाला. डहाणू मधील बोर्डी आणि नरपड मधील दोन केंद्रातील ईव्हीएम मशीन मध्ये सुरुवातीलाच बिघाड झाल्याने या केंद्रावर मतदाना आधी करण्यात येणारा ‘मॉक पॉल’ चा सराव करण्यात आला नसावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. ह्या दोन्ही मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बदलून पुन्हा मतदान प्रक्रि या सुरू करण्यास सुमारे तासभराचा अवधी लागल्याचे मतदारांनी सांगितले.

सकाळी ७ वाजता एकूण २ हजार १७७ मतदान केंद्रावर मतदानाला सुरु वात करण्यात आली. बहुतांशी भागात पहिल्या दोन तासात अल्प प्रतिसाद मिळून अवघ्या ७.८६ टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यानंतर हळूहळू मतदारांनी १० नंतर मतदान केंद्राकडे आपला मोर्चा वळविला.सकाळी ७ ते ११ ह्या वेळेत २१.४८ टक्के, ७ ते १ वाजता ३६.१२ टक्के तर ७ ते ३ वाजे पर्यंत ४६.४४ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली होती. तर ७ ते ५ वाजे पर्यंत सरासरी ५६.९६ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

पालघर शहारासह ग्रामीण भागात व्होटर स्लिप मतदारा पर्यंत वेळेत न पोचल्याने मतदानासाठी गेलेल्या अनेक मतदारांना केंद्रानजिकच्या बूथ वर आपली नावे न सापडल्याने त्यांनी कंटाळून मतदान न करताच आपल्या घरचा रस्ता धरला. सफाळे जवळील कुर्लाई मंदिराजवळ राहणाºया नेहा नरेश घरत (वय 48 वर्षे) या सफाळे येथील राजगुरु ह. म. पंडित हायस्कूल जवळच्या मतदान केंद्रा जवळील केंद्रावर मतदान करण्यास गेल्या असता तुमचे मतदान आधीच झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यांनी आलेले दोन्ही हात दाखवीत आपल्या बोटावर कुठेही शाई नसल्याचे सांगून मी मतदान केलेच नसल्याचे सांगितले.तरीही मतदान केंद्राध्यक्षांनी त्यांना मतदान करण्यास मज्जाव केल्याने त्यांनी ७ क्र मांकाचा तक्रार फॉर्म भरल्या नंतर त्यांना मतदान करू देण्यात आले. मात्र माझ्या नावावर कुणी बोगस मतदान केले ह्याचा शोध घेण्याची मागणी त्यांनी केली असता सफाळ्यात राहणाºया दुसºया एका नेहा घरत(वय 50वर्ष) या त्यांच्याऐवजी मतदान करून गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले. मात्र मतदान करतांना ओळ्खपत्रातील व्यक्ती आणि प्रत्यक्ष व्यक्ती ह्यांची पुरेशी शहानिशा न करता मतदान करू दिले गेल्याची तक्रार त्यांनी केली.

पालघर लोकसभा मतदार संघातील वसई तालुक्यात निवडणूक आयोगाच्या अधिकाºयांनी व कर्मचाºयांनी तसेच पालघर पोलिसांनी लावलेल्या चोख बंदोबस्तामुळे मतदान शांततेत पार पडले असून वसई तालुक्यात ५८.२८ टक्के मतदान झाले असून महायुतीचे राजेंद्र गावित आणि महाआघाडी व बविआचे बळीराम जाधव यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. २३ मे ला मतमोजणी झाल्यानंतर वसईतून लोकांनी कोणाला कौल दिला हेही स्पष्ट होईल.

वसई मतदार संघ १३३ मध्ये ३३८ बुथवर २३०० कर्मचाºयांनी मतदान प्रक्रि येमध्ये भाग घेतला असून कुठेही बोगस मतदान झालेले नसून तुरळक ठिकाणी व्हीव्हीपॅट आणि मतदान मशीनमध्ये बिघाड झाला होता पण तातडीने काही मिनिटांमध्ये मशीन्स बदली करून मतदान सुरळीत पार पडले असून ५ वाजेपर्यंत 58टक्के मतदान झाले असल्याचे मतदान नोंदणी अधिकारी आणि प्रांतधिकारी डॉ दीपक क्षीरसागर यांनी सांगितले आहे तर नालासोपारा मतदार संघ १३२ मध्ये ४८९ बुथवर ३२०० कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रि येमध्ये सहभाग घेतला होता. बरेच ठिकाणी मशीनमध्ये बिघाड झाला होता पण १० मिनिटांच्या आता त्या बदली करून मतदान सुरळीत पार पडले, बोगस मतदान कुठेही झालेले नाही तर ५ वाजेपर्यंत ४७ टक्के मतदान झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना कदम यांनी सांगितले आहे. वसई तालुक्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला होता. आचोळे येथील नेहमी मतदान करणाऱ्या १२५ ते १५० मतदारांची नावे विरार येथील मतदार केंद्रात समाविष्ट झाली होती.

रुग्ण व ज्येष्ठांचे हालतालुक्यातील शिरगाव येथील नजमा सरफुद्दीन शेख या पंचाहत्तर वर्षीय वृद्ध महिलेला मतदान केंद्रापर्यंत पोहोचताना हालअपेष्टांचा सामना करावा लागला. दिव्यांग,जेष्ठ नागरिक व रु ग्णांसाठी रॅम्प आणि व्हील चेअर ची व्यवस्था करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असले तरी ती नव्हती. विशेष म्हणजे या केंद्रावर मतदानासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी साडेबाराच्या सुमारास मतदान केंद्रावर येणार असल्याचे समजल्यावर व्हीलचेअर आणून ठेवण्यात आली.तर आर्यन हायस्कूल मध्ये आलेल्या रमीला पांचाळांसह अनेक दिव्यांगाना व्हील चेअर नसल्याने नातेवाईकांचा आधार घ्यावा लागत होता. पालघर मधील 96 वर्षीय स्वातंत्र्य सैनिक तथा दोन वेळा आमदार पद भूषिवलेले नवनीत भाई शहा ह्यांनी आपल्या पत्नी हिरालक्ष्मी शहा (वय 93)यांच्या सोबत आर्यन हायस्कुलमध्ये मतदान केले.

विधानसभा मतदारसंघबोईसर - 68.80%डहाणू - 66.23%विक्रमगड - 62.15%वसई - 58.28%पालघर - 65%नालासापोरा - 53.52%

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpalghar-pcपालघर