शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वसई विरार महापालिका दुर्घटनेच्या प्रतिक्षेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:14 IST

नुसत्या नोटीसांनी काय होणार? : रहिवाशांना पर्याय नाही, पुन्हा घर मिळण्याची हमी नाही

नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेच्या अंतर्गत शेकडो इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. त्यामध्ये शेकडो परिवार आपला जीव धोक्यात घालून राहतात. जोरदार पाऊस पडला तर अशा धोकादायक इमारतीना मोठ्या प्रमाणात धोका असतो. यामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये याकरिता या धोकादायक इमारतींना महानगरपालिका नोटीस पाठवून देते आणि आपला पल्ला झाडते.

या इमारती रिकाम्या करुन त्यांचा पुनर्विकास करण्यासाठी का पावले उचलत नाही? काही इमारती खाली करण्याबाबत कोर्टात केस चालू आहे. यामुळे या इमारती तोडून रिडेव्हलपमेंट करण्यासाठी कोणीही बिल्डर पुढे येत नाही. वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील नालासोपारा पूर्व विभागात मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती आहेत. काही इमारती तर कधीही पडून मोठा अपघात घडू शकतो. इमारती खाली न करता काही परिवार याच इमारतीमध्ये आपला जीव मुठित ठेवून राहतात. भरपूर वेळा धोकादायक इमारती म्हणून मनपाने नोटीस पाठवून सुध्दाही रहिवासी या इमारती रिकाम्या करत नाहीत आणि महानगरपालिका या गंभीर विषयावर मूग गिळून बसली आहे. वसई विरार महानगरपालिकाने गेल्या पावसाळ्यापूर्वी या धोकादायक इमारतीना नोटीस पाठवून रिकाम्या करण्याचे आदेश द्या असे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बजावले होते. या विभागातील प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील धोकादायक इमारतीना नोटीस पाठवल्या तरी रहिवासी त्या रिकाम्या करतच नाहीत.

याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही घर रिकामे करू पण उद्या आम्हाला घर ते पुुन्हा मिळेल याची हमी काय? याबाबत वसई विरार महानगरपालिका काही ठोस पावले उचलत नसल्यामुळे आम्ही आमचा जीव मुठित ठेवून राहत आहोत. नालासोपारा पूर्वेकडील सर्वात जास्त धोकादायक अशा २३ इमारती आत्मवल्लभ सोसायटीमधे आहेत.या इतक्या धोकादायक आहेत की काही घरे आरपार दिसत असून त्यांचे प्लास्टर मोठ्या प्रमाणात निघाले असल्यामुळे कधीही मोठी जीवितहानीची घटना घडू शकते. यांना नालासोपारा महानगरपालिका विभागाने धोकादायक इमारती म्हणून नोटीस पाठवल्या आहेत पण रहिवासी आपली घर रिकामी करीतच नाहीत.आमची पर्यायी व्यवस्था का नाही करत असे नाव न सांगण्याच्या अटीवर आम्ही या धोकादायक इमारतीमधे राहत असून अनेक परिवार राहतात. आम्हाला राहण्याची पर्यायी व्यवस्था, भाडे, डिपॉझिट आणि आम्हाला पुन्हा घर मिळेल की नाही याचे काहीही ट्रस्टी सांगत नाही म्हणून आम्ही आमचा जीव मुठित धरत राहत आहोत.- संतप्त रहिवाशी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार