मंगेश कराळे
वसई : विधानसभा निवडणुकीच्या अपयशानंतर बहुजन विकास आघडीच्या तळागाळातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफुस झाली होती. त्यामुळे पक्षाची स्थिती बिकट होती. याचाच फायदा घेऊन भाजपने वसई विरार महापालिकेवर कब्जा मिळविसाठी त्या पक्षाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वळवून घेतले. पण माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासह परिवारातील माजी आमदार क्षितिज ठाकूर, माजी महापौर प्रवीणा ठाकूर, जयेंद्र ऊर्फ भाई ठाकूर यांनी धुरा खांद्यांवर घेऊन नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जवळ घेत समजूत काढून कामाला लागण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्यांनी दिवस-रात्र घेतलेल्या मेहनतीमुळे व प्रचारामुळे निवडणुकीत त्यांच्या पक्षाने जोरदार मुसंडी मारून मनपावर ७० जागी जिंकून एकहाती सत्ता मिळवली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता महापालिकेत विजय मिळवणे आणि सत्ता टिकवणे ठाकूर पिता-पुत्रांसाठी आव्हान होते. तर दुसरीकडे भाजप विजयाची लय कायम ठेवण्यावर भर देत होते. पण हितेंद्र ठाकूर यांनी प्रचारासाठी आता शिस्तबद्ध आखणी केली होती. त्यानुसार प्रत्येक प्रभागात जाऊन स्वतः नागरिकांच्या मतदारांच्या गाठीभेटी
ठाकूर यांचा करिष्मा अबाधित
या निकालांचे श्रेय बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांच्याकडे जाते. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत तीन आमदारांचा पराभव झाला असला, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर ठाकूर यांची पकड मजबूत असल्याचे या निकालांवरून स्पष्ट होते. वसई-विरार परिसरात बविआचा प्रभाव आजही तसाच कायम आहे, हे मतदारांनी अधोरेखित केले आहे.
Web Summary : After assembly defeat, Bahujan Vikas Aghadi (BVA), led by Hitendra Thakur, regained dominance. BVA secured a landslide victory in the Vasai-Virar Municipal Corporation elections, winning 70 seats and establishing a clear majority, proving Thakur's influence remains strong.
Web Summary : विधानसभा में हार के बाद, हितेंद्र ठाकुर के नेतृत्व वाली बहुजन विकास अघाड़ी (बीवीए) ने फिर से वर्चस्व हासिल किया। बीवीए ने वसई-विरार नगर निगम चुनावों में 70 सीटें जीतकर प्रचंड जीत हासिल की, जिससे ठाकुर का प्रभाव साबित होता है।