लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा वसई विरार पालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला होणारी मतदान प्रक्रिया सुरळीतपणे व बिनचूक पद्धतीने व्हावी, यासाठी मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे तीनदिवसीय प्रशिक्षण २६ डिसेंबर ते २८ डिसेंबर या काळात जी. जी. कॉलेज वसई येथे झाले.
या प्रशिक्षणादरम्यान नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांसह तज्ज्ञ प्रशिक्षक यांनी निवडणूक कामकाजाचे धडे दिले.
तीन दिवसीय प्रशिक्षण
वसई विरार मनपा आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांनी प्रशिक्षणाला शनिवारी भेट दिली. शुक्रवारी हे प्रशिक्षण सुरू झाले होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे तसेच या तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून महेश पोंक्षे उपस्थित होते. 'निवडणुकीचे प्रशिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे मतदानाच्या वेळी कोणतीही अडचण उद्भवत नाही, असे आयुक्त म्हणाले.
आयुक्तांनी मांडले अनुभव
लोकशाहीच्या या महोत्सवात सहभागी अधिकारी व कर्मचारी यांनी अभिमान बाळगून १५ जानेवारीपर्यंत या कामात कुटुंबाप्रमाणे काम करून आपापली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडावी', असे आवाहन आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले.
आयुक्तांनी मागील निवडणुकीच्या वेळी आलेले विविध अनुभव उपस्थितांना सांगितले. निवडणुकीवेळी उद्भवणाऱ्या विविध परिस्थितीत कोणत्या उपाययोजना कराव्यात याचे अनुभवासह माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
Web Summary : Vasai Virar Municipal Corporation officers and employees received three days of election process training. Commissioner Manojkumar Suryavanshi emphasized the importance of the training for a smooth, error-free election. He shared experiences and solutions for potential issues, urging staff to work diligently.
Web Summary : वसई विरार महानगरपालिका के अधिकारियों और कर्मचारियों को चुनाव प्रक्रिया का तीन दिवसीय प्रशिक्षण मिला। आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी ने त्रुटिरहित चुनाव के लिए प्रशिक्षण के महत्व पर जोर दिया। उन्होंने संभावित मुद्दों के लिए अनुभव और समाधान साझा किए, कर्मचारियों से लगन से काम करने का आग्रह किया।