वसई-विरार शहर महानगरपालिकेने केले व्यवसाय परवाना फीचे दर कमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 05:40 PM2021-01-09T17:40:35+5:302021-01-09T17:41:31+5:30

Vasai Virar News : वसईत विविध संघटनानी यास विरोध करण्यास सुरुवात केली यामध्ये सत्ताधारी देखील सहभागी झाले होते.

Vasai-Virar Municipal Corporation has reduced the rate of business license fee | वसई-विरार शहर महानगरपालिकेने केले व्यवसाय परवाना फीचे दर कमी 

वसई-विरार शहर महानगरपालिकेने केले व्यवसाय परवाना फीचे दर कमी 

googlenewsNext

आशिष राणे, वसई 

वसई - विरार शहर महानगरपालिकेने उत्पन्न वाढीच्या दृष्टीने महानगरपालिकेने मंजूर केलेल्या व्यवसाय परवाना फीच्या दरानुसार महापालिका क्षेत्रातील व्यावसायिकांना व्यवसाय परवाना घेण्याची व परवाना नूतनीकरण करण्याकरिता कार्यवाही सुरू केलेली आहे. किंबहुना हा व्यवसाय परवाना दर जसा घोषित केला त्याचवेळेपासून वसईत विविध संघटनानी यास विरोध करण्यास सुरुवात केली यामध्ये सत्ताधारी देखील सहभागी झाले होते.

दरम्यान या परवाना फी बाबतीतल्या मुद्दे प्रसंगी कार्यवाही सुरू असताना विविध व्यावसायिक संघटना तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी परवाना फी चे मंजूर केलेले दर कमी करण्याबाबत मधल्या काळात निवेदने व विनंती अर्ज महानगरपालिकेला सादर केली होती. त्याअनुषंगाने सर्व विनंती अर्ज व निवेदनावर विचारविनिमय करून महानगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या व्यवसाय परवाना फी दरांमध्ये एकदम 50 टक्क्यांपेक्षा जास्त कपात केली असल्याचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमतला सांगितले.

व्यावसायिकांना दिलासा 

आयुक्तांनी  दि.8/01/2021 रोजी खालीलप्रमाणे नवीन सुधारित दर मंजूर केले आहेत.

परवाना फी / नूतनीकरण फी दर

अ.क्र. क्षेत्रफळ  दर (रु.मध्ये)

1. 1 ते 100 चौ. फुटापर्यंत  750

2. 101ते 250 चौ. फुटापर्यंत 1500

3. 251 ते 500 चौ. फुटापर्यंत  2500

4. 501 ते 1000 चौ. फुटापर्यंत 3500 

5. 1001 ते 2500 चौ. फुटापर्यंत  5000 

6. 2501 ते 3500 चौ. फुटापर्यंत  6000 

7. 3501ते 5000 चौ. फुटापर्यंत 7000 

8. 5001 ते 6500चौ. फुटापर्यंत 8000 

9. 6501 ते 8000चौ. फुटापर्यंत 10000

10. 8001 ते 10000 चौ. फुटापर्यंत 15000 

11. 10000 चौ. फुटाच्या पुढे  20000 

तात्पुरत्या स्वरूपाच्या कालावधीकरिता परवाना फी दर

अ.क्र. कालावधी क्षेत्रफळ दर (रु.मध्ये)

1. 01 ते 07 दिवस  250 चौ.फुट पर्यंत   1000

250 चौ.फुटाच्या पुढे   2000

2. 08 ते 15 दिवस  250 चौ.फुट पर्यंत  2000 

250 चौ.फुटाच्या पुढे   3000 

3. 16 ते 30 दिवस  250 चौ.फुट पर्यंत   3000

250 चौ.फुटाच्या पुढे   4000 

4. 31 ते 60 दिवस  250 चौ.फुट पर्यंत   5000 

250 चौ.फुटाच्या पुढे   7500 

5. 61 ते 90 दिवस  250 चौ.फुट पर्यंत   10000 

250 चौ.फुटाच्या पुढे   15000 

परिणामी वरील दरा बाबतीत सर्व व्यावसायिकांनी याबाबत नोंद घेऊन नियमाप्रमाणे महानगरपालिकेकडून व्यवसाय परवाने घेऊन, नूतनीकरण न केलेल्या परवान्याचे नूतनीकरण करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे ही पालिकेच्या वतीनं स्पष्ट सांगण्यात आले आहे

Web Title: Vasai-Virar Municipal Corporation has reduced the rate of business license fee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.