शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

वसई तालुक्यात अवघे ७६ वाहतूक पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 11:26 PM

चार शहरांमधील वाहतूक कोंडी : पुरेसे पोलीस बळ देण्याची नागरिकांची मागणी

नालासोपारा : वसई तालुक्याच्या विरार, नालासोपारा, वसई आणि नायगाव या चार शहरांमधील वाहतूककोंडी रोखण्यासाठी केवळ ७६ वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. या तुटपुंज्या पोलीस बळावर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांची मोठी तारांबळ उडते. लाखोंच्या घरात असलेली लोकसंख्या आणि रस्त्यावर धावणारी वाहने यासाठी असलेले हे तुटपुंजे पोलीस बळ पाहता सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

नालासोपारा आणि विरार येथील एकमेव ओव्हरब्रीजवर दररोज सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याने वाहतूक पोलिसांची दमछाक होते. वसई तालुक्यातील वाहतूक पोलीस खात्यात १ पोलीस निरीक्षक, २ पोलीस अधिकारी आणि ७३ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. तिसरी मुंबई ओळखल्या जाणाऱ्या आणि मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वसई तालुक्यातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी एवढेच पोलीस दल उपलब्ध असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

नालासोपारा पूर्वेकडील परिसरात आचोळे, तुळिंज, सेन्ट्रल पार्क, संतोष भवन येथे मोठ्या प्रमाणात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. तर वसईच्या पूर्वेकडील गोखिवरे, सातिवली, वालीव या औद्योगिक वसाहतीत दररोज कोंडी होते. विरारच्या पूर्व आणि पश्चिमेकडील स्टेशन परिसरातही हेच चित्र असते. या सर्व गोष्टींकडे राज्य सरकारने लक्ष देऊन वसई तालुक्यातील कोंडी रोखण्यासाठी पुरेसे पोलीस बळ देण्यात यावे अशी मागणी जनसामान्यांमध्ये जोर धरते आहे.वाहतूक पोलिसांकडे एकही टोइंग व्हॅन नाहीवसई तालुक्यातील नो पार्र्किं ग, रस्त्यावर, गटारावर तसेच स्टेशन परिसरात गाड्या लावून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाºया वाहनांना बाजूला करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे एकही टोर्इंग व्हॅन नाही. पोलिसांना काही कारणास्तव टोइंग व्हॅन हवी असेल तर महानगरपालिकेच्या मुख्यालयात फोन करून ती मागवावी लागते. वाहतूक पोलिसांना किमान दोन तरी टोर्इंग व्हॅन कायमस्वरूपी मिळायला हव्यात.

सिग्नल यंत्रणेमुळे होते वाहतूककोंडीमहानगरपालिकेने करोडो रुपये खर्च करून शहरात सिग्नल यंत्रणा उभी केली. पण याचा उपयोग होण्याऐवजी काही ठिकाणी कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुख्य रस्त्यावर आणि जेथे मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होत आहे तेथील सिग्नल यंत्रणेमधील टायमिंग केवळ २० सेकंद आहे, तर आतील रस्त्यांचे टायमिंग ६० सेकंद आहे. हे टायमिंग बदलले तर हा त्रास वाचू शकतो. 

वाहतूक शाखेत एकूण ७६ पोलीस कार्यरत आहे. भंगार गाड्या उचलून जमा करण्यासाठी जागा मिळावी आणि टोर्इंग व्हॅन मिळावी यासाठी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केलेला आहे. सिग्नल यंत्रणेमधील मुख्य रस्त्यावरील असलेला वेळ बदलण्यासाठी कंत्राटदाराशी चर्चा झाली असून लवकरच ती बदलणार जेणेकरून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होणार नाही.

- विलास सुपे, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, वसई