वसई तालुक्यात अवघे ७६ वाहतूक पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 11:26 PM2019-08-25T23:26:04+5:302019-08-25T23:26:07+5:30

चार शहरांमधील वाहतूक कोंडी : पुरेसे पोलीस बळ देण्याची नागरिकांची मागणी

In Vasai taluka, there are only 2 traffic police | वसई तालुक्यात अवघे ७६ वाहतूक पोलीस

वसई तालुक्यात अवघे ७६ वाहतूक पोलीस

Next

नालासोपारा : वसई तालुक्याच्या विरार, नालासोपारा, वसई आणि नायगाव या चार शहरांमधील वाहतूककोंडी रोखण्यासाठी केवळ ७६ वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. या तुटपुंज्या पोलीस बळावर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांची मोठी तारांबळ उडते. लाखोंच्या घरात असलेली लोकसंख्या आणि रस्त्यावर धावणारी वाहने यासाठी असलेले हे तुटपुंजे पोलीस बळ पाहता सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.


नालासोपारा आणि विरार येथील एकमेव ओव्हरब्रीजवर दररोज सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याने वाहतूक पोलिसांची दमछाक होते. वसई तालुक्यातील वाहतूक पोलीस खात्यात १ पोलीस निरीक्षक, २ पोलीस अधिकारी आणि ७३ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. तिसरी मुंबई ओळखल्या जाणाऱ्या आणि मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वसई तालुक्यातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी एवढेच पोलीस दल उपलब्ध असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.


नालासोपारा पूर्वेकडील परिसरात आचोळे, तुळिंज, सेन्ट्रल पार्क, संतोष भवन येथे मोठ्या प्रमाणात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. तर वसईच्या पूर्वेकडील गोखिवरे, सातिवली, वालीव या औद्योगिक वसाहतीत दररोज कोंडी होते. विरारच्या पूर्व आणि पश्चिमेकडील स्टेशन परिसरातही हेच चित्र असते. या सर्व गोष्टींकडे राज्य सरकारने लक्ष देऊन वसई तालुक्यातील कोंडी रोखण्यासाठी पुरेसे पोलीस बळ देण्यात यावे अशी मागणी जनसामान्यांमध्ये जोर धरते आहे.

वाहतूक पोलिसांकडे एकही टोइंग व्हॅन नाही
वसई तालुक्यातील नो पार्र्किं ग, रस्त्यावर, गटारावर तसेच स्टेशन परिसरात गाड्या लावून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाºया वाहनांना बाजूला करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे एकही टोर्इंग व्हॅन नाही. पोलिसांना काही कारणास्तव टोइंग व्हॅन हवी असेल तर महानगरपालिकेच्या मुख्यालयात फोन करून ती मागवावी लागते. वाहतूक पोलिसांना किमान दोन तरी टोर्इंग व्हॅन कायमस्वरूपी मिळायला हव्यात.


सिग्नल यंत्रणेमुळे होते वाहतूककोंडी
महानगरपालिकेने करोडो रुपये खर्च करून शहरात सिग्नल यंत्रणा उभी केली. पण याचा उपयोग होण्याऐवजी काही ठिकाणी कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुख्य रस्त्यावर आणि जेथे मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होत आहे तेथील सिग्नल यंत्रणेमधील टायमिंग केवळ २० सेकंद आहे, तर आतील रस्त्यांचे टायमिंग ६० सेकंद आहे. हे टायमिंग बदलले तर हा त्रास वाचू शकतो.
 

वाहतूक शाखेत एकूण ७६ पोलीस कार्यरत आहे. भंगार गाड्या उचलून जमा करण्यासाठी जागा मिळावी आणि टोर्इंग व्हॅन मिळावी यासाठी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केलेला आहे. सिग्नल यंत्रणेमधील मुख्य रस्त्यावरील असलेला वेळ बदलण्यासाठी कंत्राटदाराशी चर्चा झाली असून लवकरच ती बदलणार जेणेकरून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होणार नाही.

- विलास सुपे, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, वसई

Web Title: In Vasai taluka, there are only 2 traffic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.