शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वसई-सावंतवाडी रेल्वेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:40 IST

वसई ते सावंतवाडी रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी नुकतेच विरार पूर्व मनवेलपाडा येथे सह्यांची मोहीम राबवली गेली.

वसई : वसई ते सावंतवाडी रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी नुकतेच विरार पूर्व मनवेलपाडा येथे सह्यांची मोहीम राबवली गेली. दिवसभरात सह्यांच्या मोहिमेला तीन हजार कोंकणी नागरिकांनी साथ देत प्रचंड प्रतिसाद दिला आहे. तर आठवड्याभरात तब्बल पाच हजार नागरिकांनी वसई- सावंतवाडी रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी सह्यांद्वारे पाठींबा दर्शविला आहे.तालुक्यात व परिसरातील शहरात मोठ्या प्रमाणात कोकणी- मालवणी चाकरमानी वास्तव्य करतात. या चाकरमान्यांना वर्षाभरातील सण- उत्सव- समारंभ निमित्ताने गावी जाण्यासाठी दादर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या रेल्वे स्टेशन वरून ट्रेन पकडावी लागते.विरार- वसई वरून दादर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशनला आपल्या कुटूंबासह सामान घेऊन प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत असल्यामुळे वसई ते सावंतवाडी रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली. याचा फायदा डहाणू ते नायगाव येथील लाखो कोकणवासीयांना होणार आहे. गेल्या दोन आठवड्यात वसई ते सावंतवाडी रेल्वेसेवा सुरू करण्याच्या मागणीने जोर धरला.सुरवातीला वैयिक्तक स्थरावर नंतर सामुहिकरित्या बैठका- सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. कोंकणी जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दाखिवल्यामुळे वसई- सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने सह्यांची मोहीम हाती घेतली. नुकतीच विरार पूर्व मधील मनवेलपाडा तलावाजवळ सह्यांची मोहीम पार पडली. दिवसभरात या मोहिमेला तब्बल तीन हजार कोकणी चाकरमान्यानी पाठिंबा दिला असल्याचे संघटनेचे समन्वयक शैलेश मराठे यांनी सांगितले. तरी ज्या कोंकणी रहिवाश्यांना या मोहिमेत भाग घ्यायचा आहे त्यांनी शैलेश रामचंद्र मराठ, यशवंत देऊ जडयार, गजानन रमेश हरयाण, सुदर्शन शांताराम जाधवयांना संपर्क साधावा.५ हजार सह्यांद्वारे पाठिंबाआतापर्यत वसई- नालासोपारा- विरार व परिसरातील शहरामधील पाच हजार कोकणी- मालवणी रहिवाश्यांनी वसई ते सावंतवाडी रेल्वेसेवा सुरू यासाठी सह्यांद्वारे पाठींबा दर्शविली आहे. येत्या काही दिवसात संपुर्ण पालघर जिल्ह्यामध्ये तसेच मुंबई उपनगरात सह्यांची मोहीम राबविणार आहोत

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेVasai Virarवसई विरारrailwayरेल्वे