शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

वसई महापालिकेचे रुग्णालय ‘आजारी’; डॉक्टरांची कमतरता तर उपकरणांची वानवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 22:56 IST

नालासोपारा येथील महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक उपकरणांची लवकरच पूर्तता करण्यात येणार आहे.

नालासोपारा : वसई-विरार शहर महानगरपालिकेचे नालासोपारा पूर्वेकडील नगीनदासपाडा परिसरातील रुग्णालयच ‘आजारी’ असल्याचा आरोप होत आहे. या रुग्णालयात सिटी स्कॅन आणि एमआरआईची सुविधा उपलब्ध नाही. सोनोग्राफीची सुविधा आहे, पण जेव्हा आवश्यकता असते, तेव्हा ती बंद असते. १०० खाटांच्या या रुग्णालयामध्ये फक्त २५ खाटा उपलब्ध आहेत. येथे डॉक्टरांचीही कमतरता आहे. पंतप्रधान भारतीय जन औषधी केंद्रात औषधांचा तुटवडा आहे, तर कुठे मुदत संपलेली औषधे, गोळ्या गरीब रुग्णांना विकल्या जात आहेत. यामुळे स्थानिकांत संताप आहे.

या रुग्णालयाच्या स्टोअर रूममध्ये औषधांचा दुष्काळ आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना बाहेरून औषधे, गोळ्या खरेदी कराव्या लागत आहेत. असाच प्रकार पालघर जि.प. रुग्णालयातही आहे. वसई-विरारमधील जनता शहरातील दुर्गंधी व कचऱ्यामुळे वेगवेगळ्या आजाराने त्रस्त आहे. या रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टर आणि उपचारासाठी महत्त्वाची उपकरणे उपलब्ध होण्याची रुग्ण आतुरतेने वाट पाहत आहेत.नालासोपारा आणि वसईतील मनपाच्या दोन्ही रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधेची स्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही. महापालिकेच्या स्थापनेनंतर वादे वाढले, दावे वाढले आणि बजेटही वाढले, पण स्थिती आजही तीच आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारीपद असो व अन्य कोणतेही वैद्यकीय पद असो ते त्या योग्यतेनुसार भरलेले नाही. महानगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस नसून बीएएमएस आहेत. मनपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बजेट नसल्यामुळे एमबीबीएस डॉक्टरांऐवजी बीएमएस डॉक्टरांच्या सहाय्याने महानगरपालिकेचा आरोग्य विभाग चालवला जात आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णांचा आरोप आहे की, मनपाचे डॉक्टर, जनऔषधी केंद्राचे संचालक आणि खाजगी मेडिकल यांच्यामुळे येथे औषधांचा तुटवडा जाणवत आहे.

अंदाजे ३० लाख लोकसंख्या असलेल्या महापालिकेकडे फक्त दोनच सरकारी रुग्णालये आहेत. येथे डॉक्टरांची कमतरता असून आवश्यक तपासणी उपकरणांचीही वानवा आहे. महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही हॉस्पिटलमध्ये ओपीडीमध्ये दररोज ७०० ते ८०० रुग्ण येतात. इथे सिटी स्कॅन व एमआरआयची सुविधा उपलब्ध नाही. सोनोग्राफी मशीन आहे पण कधी कधी तीही बिघाड झाल्याने बंद असते. कागदावर ३ एमबीबीएस डॉक्टर, १९ स्पेशलिस्ट व ८० बीएएमएस डॉक्टर असल्याचे नमूद आहे, पण हकीकत काही वेगळीच आहे. डॉक्टरांचे नेतृत्व करणाºया मुख्य वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस नाही. आपत्कालीन व्यवस्था आणि अतिआवश्यक व्यवस्था सुद्धा नसल्यासारखीच आहे.नालासोपारा येथील महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक उपकरणांची लवकरच पूर्तता करण्यात येणार आहे. या हॉस्पिटलमध्ये २४ तास डॉक्टर उपलब्ध केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी एमबीबीएस डॉक्टरांची पदे रिक्त आहेत ती पदे भरली जातील. तसेच बाकीच्या सोयी-सुविधांची माहिती घेऊन रुग्णांना जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवल्या जातील याकडे लक्ष घालणार आहे.- प्रवीण शेट्टी, महापौर, वसई-विरार महानगरपालिकाया हॉस्पिटलमध्ये ओपीडी डिस्पेनसरी तसेच सामान्य आजारांची औषधे उपलब्ध असून बाकीची औषधे बाहेरच्या मेडिकलमधून विकत आणावी लागतात. जास्त रुग्णांना उपचारासाठी खाटांची सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना जमिनीवर झोपवावे लागते. - विजय जाधव, एका रुग्णाचे संतप्त नातेवाईक

टॅग्स :hospitalहॉस्पिटल