शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

वसई, विरारमधील नाले सफाई ३० पर्यंत होईल? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:26 AM

पालिकेने ३० मे ला नाले सफाईचे काम पूर्ण होण्याची शाश्वती दिली असली तरीही छोट्या नाल्यांची सफाई अद्यापही झालेली नसून त्यातील गाळ व कचरा तसाच आहे.

विरार : पालिकेने ३० मे ला नाले सफाईचे काम पूर्ण होण्याची शाश्वती दिली असली तरीही छोट्या नाल्यांची सफाई अद्यापही झालेली नसून त्यातील गाळ व कचरा तसाच आहे. तसेच मोठया नाल्यांची सफाई योग्यरित्या होत नसल्यामुळे महापालिकेची नाले सफाई कधी किती व कशी पूर्ण होणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पावसाळा आला की वसई तालुक्यातील नागरिकांना पाणी भरण्याची चिंता सतावत असते. गेल्यावर्षी सर्व प्रयत्न केल्यानंतर व १०० टक्के नाले सफाई झाली असल्याचा दावा करूनही नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागला होता तर यावर्षी ते होऊ नये यासाठी पालिकेने जमेल तितके प्रयत्न सुरु केले आहेत. असा दावा महापालिकेकडून होत आहे. पूरस्थिती निर्माण होण्याचे सर्वात मोठे कारण हे नाले सफाई न होणे हे असल्याने मार्चमध्ये नाले सफाईला सुरवात झाली असून आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले आहे असे महापालिकेचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी पालिकेने ४.५ करोड नाले सफाई वर खर्च केला होता यावर्षीही तितकाच खर्च नालेसफाईकरिता करण्यात येणार आहे. तर मोठ्या मोठ्या नाल्यांची सफाई पूर्ण झालेली आहे असा दावा महापालिकेचा आहे. परंतु शहरातील अनेक भागात असलेली छोटी गटारे व नाले यांची सफाई अद्यापही झालेली नाही. तसेच ज्या नाल्यांची सफाई करण्यात आली आहे त्यांचा गाळ काढून बाहेरच ठेवल्यामुळे तो पुन्हा नाल्यात पडल्याने पावसात नाले पुन्हा तुंबण्याची शक्यता वाढली आहे.गेल्या वर्षी सर्वत्र नाले सफाई करून देखील नागरिकांना अतिवृष्टीचा सामना करावा लागला होता तर माजी आयुक्त सतीश लोखंडे यांनी जागो जागी जाऊन स्वत: नाल्यांची पाहणी केली होती. स्वत: आॅडीट केले होते व त्यांचे फोटो काढून सफाईबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचवली होती. तसेच लोकांकडूनही तक्र ार व माहिती घेण्यासाठी व्यासपीठ तयार केले होते. मात्र, यावेळी असं काहीच घडतांना दिसत नाही. लोकसभा निवडणुकीमुळे अधिकारी व आयुक्त हे निवडणुकीच्या कामात व्यस्त होते तर आता पुन्हा मतमोजणीचे काम सुरु होणार असून अधिकारी त्यात व्यस्त असतील. त्यामुळे ठेकेदाराचे चांगलेच फावले असून नाले सफाईत हात सफाई होतांना दिसत आहे. वसई पश्चिमेकडील माणिकपूर बºहामपूर, आनंदनगर, पांचाळनगर या परिसरातील पाण्याचा निचरा ७६ ओहोळातून होतो. हा भाग रेल्वेच्या प्लॅटफॉर्मच्या खालून गेला आहे. त्यामुळे तेथील सफाई झालेली नाही.कॅल्व्हर्टची सफाई नाहीविशालनगर, शास्त्री नगर, अंबाडी रोड येथील नाल्यामधून सोपारा खाडीत पाणी जाते. याठिकाणी अडथळे येतात त्यामुळे योग्य ती सफाई होत नाही. नालासोपारा पश्चिम, गास, निर्मळ, गिरीज, सांडोर, सालोली व तत्कालीन नवघर माणिकपूर नगरपरिषदेचा भाग हा कॅल्व्हर्ट ७८ मधून जातो.छोटया नाल्यांच्या सफाईकडे झाले आहे दुर्लक्षपावसाळयात माणिकपूर, स्टेशन परिसर, आनंद नगर, पूर्र्व भाग, नालासोपारा ते स्टेशन परिसर, आचोळे रोड, अलकापुरी, गालानगर, एव्हर शाइन, शिर्डी नगर, सेंट्रल पार्क, विजय नगर, ओसवाल नगरी, मोरेगांव, तुळींज रोड पश्चिम के निलेमोरे, लक्ष्मीछेडा मार्ग, पाटणकर पार्क, हनुमान नगर, श्रीप्रस्था, विरार पूर्व मनवेलपाडा, कारगिल नगर, नाना नानी पार्क, फुलपाडा, स्टेशन परिसर, पश्चिम ते एमबी इस्टेट, बोलींज, स्टेशन रोड इत्यादी ठिकाणी पाणी साचण्याची समस्या होते. याठिकाणी असलेल्या नाल्यांमध्ये अद्यापही घाण साचलेली असून त्याकडे महापालिकेचे लक्ष नाही. ते आता जाणार कधी आणि सफाई होणार कधी?

टॅग्स :Vasai Virarवसई विरार