शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उत्तनच्या महापालिका बेकायदा कचरा डम्पिंगला पुन्हा भीषण आग ; स्थानिकांच्या शिष्ट मंडळाने पोलिसात केली तक्रार 

By धीरज परब | Updated: February 2, 2025 12:24 IST

उत्तन धावगि येथे घनकचरा प्रकल्पसाठी शासनाने मोफत जागा दिली असताना मीरा भाईंदर महापालिकेने मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी बेकायदा कचरा डम्पिंग चालवले आहे. त्यातूनच येथे कचऱ्याचा भला मोठा डोंगर उभा राहिला आहे.

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील डम्पिंगला गेल्या वर्षीच्या मार्च नंतर पुन्हा १ फेब्रुवारी रोजी भीषण आग लागली आहे. त्यामुळे परिसरात प्रदूषित धुराचे लोळ उठले असून स्थानिक नागरिक पुन्हा संताप व्यक्त करत आहेत. तर अग्निशमन दल आग आटोक्यात आण्यासाठी प्रयत्न करत आहेत. रविवारी सकाळ पर्यंत आग धुमसत होती. 

उत्तन धावगि येथे घनकचरा प्रकल्पसाठी शासनाने मोफत जागा दिली असताना मीरा भाईंदर महापालिकेने मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी बेकायदा कचरा डम्पिंग चालवले आहे. त्यातूनच येथे कचऱ्याचा भला मोठा डोंगर उभा राहिला आहे. आधीच ह्या डम्पिंग मधून निघणाऱ्या लिचेट मुळे खालची शेती नापीक होऊन विहरीचे पाणी प्रदूषित झाले आहे. शिवाय परिसरात रोजची प्रचंड दुर्गंधी पसरते. तर ह्या जागेत अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामे पालिकेच्या आशीर्वादाने फोफावली आहेत. 

पूर्वीच्या सुमारे १० लाख टन साचलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंगसाठी पालिकेने कोट्यवधींचा ठेका दिला.  मात्र काम न केल्याने ठेका गेल्या वर्षी रद्द केला . तर रोज येणाऱ्या कचरा सपाटीकरण करण्यासाठीचा वेगळा ठेका मात्र एका माजी नगरसेवकाशी संबंधित एकाच ठेकेदारास गेल्या अनेक वर्षां पासून आंदण दिल्याची चर्चा आहे . डम्पिंग ला आग लागल्यास परिसरातून पाणी टँकरने पुरवण्याचा ठेका देखील परिसरातील एकाला दिला गेला. 

डम्पिंग मध्ये रोज वर्गीकरण न केलेला कचरा गोळा होत आहे. आगी लागण्याच्या घटना सातत्याने घडत आल्याने नागरिकांनी तक्रारी व आंदोलनाचे इशारे दिले. गेल्या वर्षी मार्च मध्ये भीषण आग लागल्या नंतर लोकांनी संताप व्यक्त केला असता महापालिकेने पहिल्यांदा आगी प्रकरणी अनोळखी व्यक्ती वर उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्या नंतर आग लागण्याचे प्रकार जवळपास बंद झाल्या मुळे स्थानिकांना दिलासा मिळाला होता. 

परंतु शनिवार २ फेब्रुवारी रोजी बेकायदा डम्पिंग ला दुपारी पावणे ३ च्या सुमारास पुन्हा भीषण आग लागली आहे. डम्पिंग मध्ये बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात असल्याने आग वेगाने फोफावण्यासह घातक असा धूर सर्वत्र पसरला आहे.  पसरलेला विषारी धूर व रोजची दुर्गंधी यामुळे लोकांना श्वास घेणे अवघड झाले असून अनेकांना आजारांना सामोरे जावे लागत आहे. 

 अग्निशमन दलाचे ३ अधिकारी व ३४ जवान आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ८ अग्निशमन बंब तैनात केले असून पाण्याचे ६ टँकर पाणी आणण्याचे कामी लावलेले आहेत. रात्री आग वाढली होती. रविवार सकाळ झाली तरी आग धुमसत होती. 

सातत्याने आगी लागण्या मागे ठेकेदारांचे व अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप पुन्हा होऊ लागला आहे .  विशेष म्हणजे गेल्या वर्षी आग लावणाऱ्या अनोळखी विरुद्धचा दाखल गुन्हा अजून गुलदस्त्यात आहे. आगीच्या घटने नंतर शनिवारी सायंकाळी संघर्ष समितीच्या वतीने फादर ऑस्कर मेंडोन्सा, विद्याधर रेवणकर, डेनिस नुनीस, हिलरी मेंडोन्सा व अन्य स्थानिकांनी मिळून उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी नाईक यांना भेटून तक्रार दिली. त्यात नेहमी प्रमाणे आग लागण्याच्या घटना घडत असून पोलिसांनी देखील ह्याचा तपास करावा अशी मागणी केली. 

विद्याधर रेवणकर ( स्थानिक ग्रामस्थ ) - उत्तन डम्पिंग हा आमच्या निसर्गरम्य गावांना लागलेला शाप आहे. स्थानिकांनी सातत्याने तक्रारी , बैठका , आंदोलन व याचिका करून देखील महापालिकेला बेकायदा डम्पिंग आणि त्याला आगी लागण्याच्या प्रकारांना रोखण्यात अपयश आलेले आहे. आग आणि विषारी धुराचा त्रास व रोजची दुर्गंधी बंद होऊन नागरिकांची ह्यातून सुटका पालिकेने करावी .

टॅग्स :fireआगMira Bhayanderमीरा-भाईंदर