शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

वाढलेल्या टक्क्यांमुळे उमेदवारांत अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2019 4:17 AM

पालघरमध्ये २०१८ साली झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची आकडेवारी १०.५ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे उमेदवांरांमध्ये अस्वस्थता पसरली आहे, कारण हे वाढलेले मतदानच विजेता ठरविणार आहे

हितेन नाईक  पालघरमध्ये २०१८ साली झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची आकडेवारी १०.५ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे उमेदवांरांमध्ये अस्वस्थता पसरली आहे, कारण हे वाढलेले मतदानच विजेता ठरविणार आहे. त्यातही वसई, नालासोपारा, बोईसरमधील वाढीव मतांवर विआचे नेते दावा करत आहेत, तर हा वाढीव टक्का आमचाच असल्याचा शिवसेनेचा दावा आहे. ग्रामीण भागात शिवसेनेला भाजपची किती मदत झाली, त्याबद्दल वेगवेगळा अंदाज व्यक्त होत आहे. शिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी ग्रामीण भागात असलेल्या आपल्या प्रभावाबद्दल मतदानापूर्वी वेगवेगळे दावे केले होते. ते प्रत्यक्षात कितपत खरे होते, याचा अंदाज मतदानानंतर लागेल. नालासोपाऱ्यात मतदानापूर्वी झालेल्या राड्याचा परिणामही त्याच वेळी दिसून येईल.

या मतदारसंघातून एकूण १२ उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत होती ती सेना-भाजप युतीचे उमेदवार राजेंद्र गावित आणि आघाडी पुरस्कृत बविआचे उमेदवार बळीराम जाधव यांच्यात. यंदा १८ लाख ८५ हजार २९७ मतदारांपैकी १२ लाख १ हजार २९८ मतदारांनी आपला हक्क बजावला. २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ५३.२२ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे वाढलेले १०.५ टक्के मतदान कुणाला फायदेशीर ठरते, यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.

मे २०१८ च्या पोटनिवडणुकीत एकूण १७ लाख ३१ हजार ७७ एवढे मतदार होते. यावर्षी ही संख्या वाढून एकूण १८ लाख ८५ हजार २९७ मतदारांची नोंद झाली आहे. त्यात ९ लाख ८८ हजार ९९७ पुरु ष, ८ लाख ९६ हजार १८९ महिला, तर १११ तृतीय पंथीय मतदारांचा समावेश आहे. यंदा एकूण मतदारांपैकी १२ लाख १ हजार २९८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, त्यात ६ लाख ४१ हजार १५६ पुरु ष (६४.८३ टक्के), ५ लाख ६० हजार ११८ महिलाा (६२.५० टक्के), तर २४ तृतीयपंथीय (२१.६२ टक्के) मतदारांचा समावेश आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpalghar-pcपालघर