शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

कांदळवनात उभारले बेकायदा गोदाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:53 IST

मीरा रोड : भार्इंदरच्या नवघर येथे कांदळवनात बेकायदा उभारलेल्या चौधरी डेकोरेटाच्या गोदामाच्या ठिकाणी टाकलेल्या डेब्रिजचे सपाटीकरण करताना जेसीबीसह टेम्पो पाणथळ तक्रार निवारण समितीने जप्त करून चालकांना पोलिसांच्या ताब्यात दिले.जिल्हाधिकाºयांनी मीरा- भाईंदरमधील कांदळवन व पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीने शनिवारी मुर्धा खाडी परिसर, बामणदेव नगर, आरएनपी पार्क, ...

मीरा रोड : भार्इंदरच्या नवघर येथे कांदळवनात बेकायदा उभारलेल्या चौधरी डेकोरेटाच्या गोदामाच्या ठिकाणी टाकलेल्या डेब्रिजचे सपाटीकरण करताना जेसीबीसह टेम्पो पाणथळ तक्रार निवारण समितीने जप्त करून चालकांना पोलिसांच्या ताब्यात दिले.जिल्हाधिकाºयांनी मीरा- भाईंदरमधील कांदळवन व पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीने शनिवारी मुर्धा खाडी परिसर, बामणदेव नगर, आरएनपी पार्क, सरस्वती नगर, शिवशक्ती नगर - नवघर येथील पाहणी केली. या वेळी जागोजागी कांदळवनाचा ºहास करून बेकायदा भराव व बांधकामे आढळली. रिलायन्सच्या अधिकाºयांनाही वीज जोडण्या खंडित करण्याचे निर्देश दिले.दरम्यान, नवघर येथील कांदळवन - सीआरझेड १ क्षेत्राने बाधित विश्वकर्मा वाडी व परिसराची पाहणी करताना चौधरी डेकोरेटरने कांदळवनात उभारलेले बेकायदा गोदाम आढळले. त्या ठिकाणी झाडांच्या फांद्या तोडलेल्या तसेच जेसीबीने डेबिज पसरवण्याचे काम सुरू होते. तर टेम्पोमध्ये सामान भरले जात होते.समितीचे सचिव व नायब तहसीलदार पंढरीनाथ भोईर, मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार, बंदर निरीक्षक सुप्रिया बनकर, वन विभागाचे देशमुख, निचिते, साळवे, मोरे, मंसुरी यांच्यासह पीआरपीचे सुनील भगत आदींनी जेसीबी व टेम्पो जप्त करून चालकांना नवघर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस निरीक्षक राम भालसिंग यांनी वाहने जप्त करून गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली.