शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंना अल्प प्रतिसाद, पालघर दौरा ‘फसला’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 05:12 IST

पालघर दौरा ‘फसला’ : नियोजन नाही, उपस्थिती नाही, शिवसैनिक नाराज

पालघर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पालघर जिल्हा प्रचार दौऱ्याला अल्प प्रतिसाद मिळाला असून या दौऱ्यात बोईसर, पर्नाळी पाचमार्ग चिंचणी येथे त्यांनी जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तर या दौºयात पाचमार्ग येथील सभेत मच्छीमारांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा आश्वासनांची खैरात करून नाराज मच्छीमारांना तसेच स्थनिक भूमिपुत्रांना कुरवाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या सोबत पालक मंत्री एकनाथ शिंदे, खा.राजेन्द्र गावित, आ. रविंद्र फाटक, श्रीनिवास वनगा व सेनेचे स्थानिक पदाधिकारी होते.

पाचमार्ग येथे बुधवारी दुपारी झालेल्या सभेत बोलताना ठाकरे यानी वाढवण बंदर जर स्थानिकांना नको असेल तर होऊ देणार नाही, जिंदाल जेटीलाही विरोध करु , तारापूर अणुशक्ती केंद्रापासून महामार्गा पर्यंत आपत्कालीन चौपदरी मार्ग, दांडी-नवापूर खिंडीवर पूल बांधणे, तारापूर अणुशक्ती केंद्रातील कंत्राटी कमगाराना कायम करणे अशी प्रत्येक वेळी दिली जाणारी आश्वासने दिलीत. नागझरी येथे तीन तासांपासून वाट पाहत असलेल्या शिवसैनिक निराश झाले. ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील या आशेने स्टेज निर्माण केले होते. मात्र ठाकरे यांनी रस्त्यावरच शिवसैनिकांशी पाच मिनिटे चर्चा केली त्यामुळे तीन तास वाट बघत असलेल्या शिवसैनिकांना निराश होऊन परतावे लागले.एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्ह्यात शिवसेनेची लावली वाटच्जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांना दाबून टाकण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी गेले वर्षभर केलेले कुटील प्रयत्न, पालघर नगराध्यक्षपदासाठी सेनेच्या अनेक महिला इच्छुक व सक्षम असतांना त्यांच्याऐवजी राष्टÑवादीतून आयात केलेल्या महिलेला ती उमेदवारी बहाल केली.च्मतदारांनी तिला पराभूत केले आणि या पालिकेतील शिवसेनेची सत्ता संपुष्टात आली. एवढा दणका बसला तरी शिंदेंची दादागिरी आणि पैशाच्या जोरावरची दमनशक्ती सुरू असल्याने या जिल्ह्यातील शिवसेनेत मरगळ पसरली आहे.च्जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांना पराभूत करण्यासाठी सेनेच्याच मंत्र्याने म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जंगजंग पछाडले असे अभूतपूर्व दृश्य पालघर पालिकेच्या वॉर्ड क्र. ८ अ मध्ये पहायला मिळाले. या सगळ्याचा परिणाम पालघर लोकसभा निवडणुकीवर होतो आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेpalghar-pcपालघरlok sabhaलोकसभा