शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

ग्रामीण बँकेसह दोन दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 3:13 AM

शहरातील बाजार पेठेतील उधवा रोड वरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह हार्डवेअर व डॉक्टरचे क्लिनिक रात्री दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी फोडून रोकड पळविली मात्र, बँकेतील रोकड लांबवितांना त्यांना यश आले नाही त्यातच ते बँकेच्या सीसीटिव्हीत कैद झाले आहेत.

तलासरी : शहरातील बाजार पेठेतील उधवा रोड वरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह हार्डवेअर व डॉक्टरचे क्लिनिक रात्री दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी फोडून रोकड पळविली मात्र, बँकेतील रोकड लांबवितांना त्यांना यश आले नाही त्यातच ते बँकेच्या सीसीटिव्हीत कैद झाले आहेत.उधवा रोड वरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा मुख्य दरवाज्याचे टाळे फोडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. कॅशिअर चे केबिनचे टाळे तोडले पण त्यांना रोकड लांबविता आली नाही. दरम्यान, ते चोरटा बँकेच्या सीसीटिव्हीत कैद झाला आहेत. बँकेचा मुख्य दरवाज्याचा टाळा तोडला असतांना सावधानतेचा भोंगा नादुरु स्त असल्याने तो वाजला नाही. तसेच, बँकेच्या बाजूला असलेल्या हार्डवेअरचे दुकान फोडून एक हजार रु पये रोकड त्यांनी लांबविली तर डॉ. पाटील यांचे प्रेरणा क्लिनिक फोडून गल्ल्यातील तीन हजार रु पये लंपास केले.सद्या तलासरी गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दररोज चोरीच्या घटना घडत आहेत. पोलिसांची गस्त सुस्त असल्याने चोरटे गावात फिरत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.तलासरी गावात मोठ्या प्रमाणात भंगार खरेदी विक्री करणारे आल्याने चोरीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. गावात रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या अनोळखी इसमा विरोधी कारवाई करणे गरजेचे आहे. तलासरी बाजार पेठेत, गावात अधिकाºयांबरोबर पोलिसांची गस्त संध्याकाळी दिसून येते. मात्र, रात्रीच्या गस्ती वाढविण्याची वेळ आली आहे. या पूर्वीसुद्या अनेक गुन्ह्याच्या घटनांमध्ये सीसीटीव्हीची मदत झाली होती मात्र त्या प्रकरणांमध्ये गुन्हेगार सापडल्याचे दिसत नाही.