शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Dahanu: ‘सयाजी’मध्ये सापडले दोन दिवसांचे अर्भक, पालकांचा पोलिसांकडून शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 03:20 IST

Dahanu News: गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या सयाजी एक्स्प्रेसमध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास दोन दिवसांचे अर्भक रडत असताना आढळले. त्याच्या पालकांचा शोध घेतला असता, कोणीही न आल्याने काही प्रवाशांच्या मदतीने डहाणू रेल्वे पोलिसांच्या ताब्यात या अर्भकाला देण्यात आले आहे.

डहाणू : गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या सयाजी एक्स्प्रेसमध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास दोन दिवसांचे अर्भक रडत असताना आढळले. त्याच्या पालकांचा शोध घेतला असता, कोणीही न आल्याने काही प्रवाशांच्या मदतीने डहाणू रेल्वे पोलिसांच्या ताब्यात या अर्भकाला देण्यात आले आहे. दरम्यान, या बाळाच्या माता-पित्यांचा शोध सुरू आहे.

या बालकाला डहाणू उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले असून, डहाणू आरपीएफ तसेच जीआरपी पोलिसांनी वापी रेल्वे पोलिसांशी संपर्क करून त्यांच्याकडे हे बालक सुपूर्द करणार असल्याची माहिती पालघर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी  वसंत रॉय यांनी दिली.

भरूचहून मुंबईकडे जाणाऱ्या  सयाजी एक्स्प्रेसमध्ये बालकाच्या रडण्याचा आवाज प्रवाशांच्या कानावर पडला असता, लहान मूल रडत असल्याचे समजून प्रवाशांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, वापी येथे बाळाच्या रडण्याचा आवाज वाढू लागल्याने प्रवाशांनी आवाजाचा शोध घेतला असता, सीटच्या खाली दोन दिवसांचे बाळ  दिसून आले. त्याच्या पालकांचा शोध घेतला असता, कोणीही पुढे आले नाही. दरम्यान, वापीहून ट्रेन सुरू झाल्याने प्रवाशांनी पुढील डहाणू रेल्वे पोलिसांना कळवून  डहाणू येथे आरपीएफच्या ताब्यात बाळ दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी