शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

घातक घनकचरा नेणारा ट्रक पकडला; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 22:59 IST

शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी मुंबईतील धारावी येथे केला रवाना

बोईसर : तारापूर एमआयडीसीमधील एका रासायनिक कारखान्यातून घातक घनकचऱ्याने भरलेला ट्रक धारावी मुंबई येथे अनधिकृतपणे नेला जात असताना बोईसर पोलिसांनी पकडला असून या ट्रकमध्ये प्रथमदर्शनी घातक स्वरूपातील सहा हजार ४१० किलो घातक घनकचरा असल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या संदर्भात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.युनिलेक्स एक्स्पर्ट लि. प्लॉट नं.ई-२ या कंपनीमधील तीन हजार ३३० किलो वजनाच्या घातक घनकचºयाने भरलेल्या प्लास्टिक बॅगा आणि ३०८० किलो वजनाचे केमिकलने माखलेल्या रिकाम्या प्लास्टिक बॅगा हा अती प्रदूषित घनकचरा तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट यांच्याकडे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाटीसाठी न पाठवता मुंबईतील धारावी येथे घेऊन जात होता. त्यावेळी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कॅम्लीन नाका जिंदाल कंपनीच्या बाजूला बोईसर पोलिसांनी तो ट्रक पकडला.या पकडलेल्या ट्रकमधून वाहून नेणाºया मालाबाबतच्या अभिप्रायासंदर्भातचे पत्र बोईसर पोलीस ठाण्याकडून म.प्र.नि.मंडळाच्या तारापूर विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर यांना प्राप्त होताच त्यांनी घनकचरा आणि सदर वाहनचालकाकडील कागदपत्रांची पाहणी केली. गंभीर बाब म्हणजे बोईसर पोलीस ठाण्यात या ट्रकमधील मालाची तपासणी केली असता वर केमिकलने माखलेल्या रिकाम्या प्लास्टिक बॅगा तर त्याखाली घातक घनकचºयाने भरलेली प्लास्टिक बॅग आढळून आली. जेव्हा ट्रक पकडला तेव्हा चालकाकडे कुठल्याही प्रकारची कागदपत्रे नव्हती ती नंतर सादर केल्याचे बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी सांगितले.म.प्र.नि. मंडळाने मे.युनिलेक्स एक्सपर्ट लि. या उद्योगास दिलेल्या संमतीपत्राप्रमाणे कंपनी हा घातक घनकचरा कोणतीही परवानगी न घेता परस्पर विल्हेवाट लावत असल्याचे या घटनेनंतर समोर आले असले तरी चौकशीअंती आणि नमुने तपासणी अहवालानंतर वास्तव समोर येणार आहे.या घातक घनकचºयाचे रसायनमिश्रीत प्लास्टिक नमुने हे युनिलेक्स एक्सपर्ट लि. कंपनीचे मॅनेजर संजयकुमार शर्मा (५८) यांच्या समक्ष घेतलेले असून ते सीलबंद करण्यात आले आहेत. त्यातील एक भाग हा रासायनिक तपासणीकरिता पाठविण्याकरिता पोलिसांचे ताब्यात दिले आहे व उर्वरित दोन भाग हे प्रदूषण नियंत्रण मंडळाने ताब्यात घेतले आहेत. घातक घनकचरा वाहून नेण्यासाठी वापरलेला ट्रक बोईसर पोलिसांनी ताब्ब्यात घेतला आहे.