शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बविआ आणि महाविकास आघाडीत चिन्हावरून पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 10:30 IST

भाजपला रोखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : वसई-विरार पालिकेसाठी महाविकास आघाडीने हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीसोबत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी समान चिन्हाच्या आग्रहामुळे त्यांच्यात पेच निर्माण झाला आहे. ‘शिट्टी’ या चिन्हावर निवडणूक लढवावी, असे ठाकूरांनी उद्धवसेनेसह काँग्रेसला सांगितले आहे. नवीन चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी, असा पर्याय महाविकास आघाडीने दिला आहे; परंतु यापैकी कशावरही अद्याप एकमत झालेले नाही.

भाजपला रोखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र आले आहेत. मात्र, आता निवडणूक चिन्ह काय असावे, याबाबत पेच निर्माण झाला आहे. ४ पक्ष एकत्र असल्याने कोणाचेही अधिकृत चिन्ह न वापरता गोंधळ टाळण्यासाठी सर्व पक्षांनी समान चिन्हावर निवडणूक लढवावी, असे ठरले आहे. मात्र, समान चिन्ह काय असावे, त्यावरच या नव्या आघाडीमध्ये पेच निर्माण झाला आहे.

बविआचे चिन्ह शिट्टी आहे आणि त्यावरच निवडणूक लढवावी, असा बविआ अध्यक्ष ठाकूरांचा आग्रह आहे. काँग्रेस आणि उद्धवसेना शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवायला तयार नाहीत. शिट्टी चिन्ह घेतले तर आम्ही बविआमध्ये विलीन झालो, असा समज होईल. ज्या शिट्टीला आजवर विरोध केला त्याच चिन्हावर मते कशी मागणार, अशी भूमिका उद्धवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण म्हाप्रळकर यांची आहे.

...तर मतदारांपर्यंत पोहोचता येईलपंजा हे चिन्ह घेण्याचे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, नवीन चिन्ह घेतले तर  मतदारांपर्यंत पोहोचता येणार नाही, अशी भूमिका हितेंद्र ठाकूर यांनी मांडली. सध्या समान चिन्हाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे दोन्ही पक्षांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Alliance faces symbol clash between BVA and Maha Vikas Aghadi.

Web Summary : The Maha Vikas Aghadi alliance with BVA in Vasai-Virar faces deadlock over a common election symbol. Thakur insists on the 'whistle' symbol, opposed by Congress and Uddhav Sena who fear losing identity. Discussions continue to find a solution.
टॅग्स :Vasai Virar Municipal Corporation Electionवसई विरार महानगरपालिका निवडणूक २०२६Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६