शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

वनहक्क कायद्याने मिळालेल्या जमिनीवर आदिवासींना हवा घरे बांधण्याचा अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 00:16 IST

कष्टकरी संघटनेची मागणी : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काढावे विशेष आदेश

जव्हार : अनुसूचित क्षेत्रात गावठाण विस्तारासाठी वन जमीन उपलब्ध करून दिली जाईल या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निर्णयाचे कष्टकरी संघटनेने स्वागत केले आहे. मात्र वन हक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनीवर आदिवासींना घराच्या अधिकाराला वन विभागाकडून आजही रोखले जात आहे. त्यामुळे वन विभागाने अशा प्लॉटधारकांना घरासाठी मान्यता द्यावी, राज्यपालांनी यासाठी विशेष आदेश काढावे, अशी मागणी कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांनी केली आहे.

मागील काही वर्षांत पालघर जिल्ह्यातील जव्हार वन विभागाने आदिवासींना वन जमिनीवर घर बांधण्याच्या अधिकारास मान्यता देण्यास नकार दिला होता. वन जमिनी कसणाऱ्या आदिवासींनी या जमिनीवरही पीक व झाडांच्या रक्षणासाठी तेथे घर बांधली आहेत. मात्र वन विभागाने आदिवासींनी बांधलेली घरे बेकायदेशीर असल्याचे कारण देऊन पाडून टाकली असून आदिवासी विरोधात गुन्हेही दाखल केले आहेत. आदिवासींना वन हक्क कायद्यांतर्गत प्राप्त जमिनीवर वस्ती करण्याच्या हक्काची तरतूद असतानाही हे घडत आहे. दरम्यान नवीन अधिसूचना स्वागतार्ह असली तरी या अधिसूचनेत वन हक्क कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनीवर घराचा अधिकार मिळणे ही बाब दुर्लक्षित केलेली आहे. म्हणून राज्यपालांनी वन हक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनीवर आदिवासींना घराच्या अधिकाराला मान्यता द्यावी, यासाठी विशेष आदेश काढावे. तसेच अशा जमिनीवर उभारलेली घरे पाडून टाकण्यापासून व गुन्हे दाखल करण्यापासून रोखावे, अशी मागणी कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांनी राज्यपालांना केली आहे.८ ते १० पाडे मिळून बनलेल्या आदिवासी गावात आज केवळ २ ते ३ वस्त्यांसाठी गावठाण उपलब्ध आहे. परिणामी अशा ठिकाणी घरांसाठी जागांची मोठी कमतरता भासते. यातच कुटुंबाचा जसा विस्तार होत जातो तसे ही समस्या अधिक भेडसावू लागते. ही अधिसूचना जंगलाच्या राजाला त्याच्याच राज्यात राहायला जागा आहे याला मान्यता देत असून, हा निर्णय आदिवासींच्या हिताचा ठरला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारTrible Development Schemeआदिवासी विकास योजना