शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

प्रांत कार्यालयावर आदिवासींचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:22 IST

मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषण : विकासाच्या नावाखाली सरकारने जमिनी हडपल्याचा आरोप

वसई : तालुक्यातील आदिवासी समाजाचे वास्तव्य असलेले पाडे विकासाच्या नावाखाली सरकार व धनदांडगे लोक उद्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या अस्तित्वाची लढाई लढत येणाऱ्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आता आदिवासी समाज गांधिजींच्या मार्गाने उपोषणाचे शस्त्र हाती घेऊन निद्रीस्त सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी सोमवारी तालुक्यातील आदिवासी एकता परिषदेच्यावतीने एका विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने हा मोर्चा प्रात कार्यालयावर धडकला. तेथे परिषदेच्यावतीने मागण्या मान्य न झाल्यास बेमूदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

आदिवासी समाजाच्या अनेक मागण्या गेल्या काही वर्षापासून प्रलंबीत आहेत. वर्षानुवर्षे हा समाज राहत असलेल्या सरकारी व शेठ सावकारांच्या जागेवर आजही शर्णार्थी असल्या सारखी गत आहे. तो भूमिहीन शेतमजूराचे जिवन जगत असल्याने त्यांना राहत असलेल्या व वहिवाटीच्या जमिनीचे सातबारे जावे अशी त्यांची प्रमूख मागणी आहे. महाराष्ट्र शासनाची व वनखात्याच्या जागेवरील भात शेतीचे अतिक्र मण त्विरत नियमानुकूल करण्याची कार्यवाही करणे, वर्ष २००० च्या शासननियमानुसार आदिवासी समाजाच्या जातीच्या दाखल्यावर कुठल्याही धर्माचा उल्लेख न करता दाखले देण्यात यावे, अशिक्षीत आदिवासी समाजाच्या लोकांना जातीचे दाखले दिले जावे, गास गावातील शासनाची जमीन आदिवासी समाजाच्या भूमिहीन व शेतमजुरांना भातशेती करण्यास देण्यात यावी, गिरीज येथील सरकारी जमीनिवरील अतिक्रमण हटविण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी आदिवासी एकता परिषदेचे तालुका अध्यक्ष दत्ता सांबरे व तालुका उपाध्यक्ष वंदना जाधव यांच्या नेतृत्वाखाली वसई डेपो ते प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता. प्रांत कार्यालयावर हा मोर्चा पोहचताच तेथे सभेत रूपांतर झाले. आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहित, तोपर्यंत आंम्ही बेमूदत आमरण उपोषण करणार असल्याचे सांबरे यांनी सांगीतले. याबाबत प्रांताधिकारी दिपक क्षिरसागर यांनी मोर्चेकऱ्यांना आश्वस्त केले.५६ पाड्यांवरील बांधवांचा अर्जवाघोली, निर्मळ, भुईगांव बुद्रूक, भुईगांव खुर्द, गास, गिरीज, सालोली, चुळणे, रानगांव, बाभोळा, नाळे, आगाशी, अर्नाळा, कोफराड, बोळींज विरार पूर्व,कळंब, सत्पाळा,पापडी या गावांमधील तब्बल ५६ आदिवासी पाड्यांवरील शेकडो बांधवांनी आदिवासी बांधवांच्या घराखालील जागा नावें करण्यासाठी अर्ज केलेले आहेत.च्आदिवासी समाजाच्या विकासासाठी अनेक वर्षापासून शासन योजना राबविण्याबाबत निर्णय झालेले आहेत. राहिल त्याचे घर, कसेल त्याची जमीन मात्र ज्या आदिवासी लोकांकडे जमीनच नाही अशांना सरकार चार एकर जमीन भातशेतीसाठी देते. मात्र, या योजनेसाठी जातीच्या दाखल्याची आवश्यकता असते. ते दाखले शासनानेच उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आता करण्यात येत आहे.च् तालुक्यातील पारंपारिक आदिवासी पाडे विकासाच्या नावाखाली उद्वस्त करत त्यांना देशोधडीला लागले जात असून, भूमिहीन आदिवासी समाजाला कसण्यासाठी जमीन न देता ती धनदांडग्यांना कोळंबी प्रकल्पासाठी व वेगवेगळ्या विकासाच्या प्रकल्पासाठी देत आदिवासी पाड्यांवर वरवंटे फिरवले जात असल्यामूळे आदिवासी समाज संतप्त झाला आहे.च्गिरीज येथे सर्वे नंबर १४२ या जागेत अतिक्र मण केले गेले आहे. याबाबत वसई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला असतानाही कारवाई केली जात नाही. सदरे अतिक्र मण त्वरीत हटविण्यात यावे अशी मागणी के ली आहे.