शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महसूलकडून तिरंग्याचा अवमान? राष्ट्रध्वज ठेवला टेबलावर, माजी आमदार, जि.प. अध्यक्षांची तक्रार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 06:28 IST

महसूल खात्याने प्रांताधिकारी आणि तहसिल कार्यालयाच्या आवारात आयोजित केलेल्या झेंडावंदन समारंभात तिरंगा चक्क टेबलावर ठेवल्याने तिरंग्यांचा अवमान झाल्याची तक्रार माजी आमदार आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांनी प्रांताधिकाºयांकडे केली आहे.

वसई : महसूल खात्याने प्रांताधिकारी आणि तहसिल कार्यालयाच्या आवारात आयोजित केलेल्या झेंडावंदन समारंभात तिरंगा चक्क टेबलावर ठेवल्याने तिरंग्यांचा अवमान झाल्याची तक्रार माजी आमदार आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांनी प्रांताधिकाºयांकडे केली आहे.प्रजासत्ताक दिनानिमित्ताने वसईत महसूल खात्याने तहसिल आणि प्रांताधिकारी कार्यालयासमोर झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. माजी आमदार डॉमणिक घोन्सालवीस आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबन नाईक सालाबादप्रमाणे यंदाही झेंडावंदनाला उपस्थित राहिले होते. त्यावेळी झेंडावंदनापूर्वी दोन्ही ठिकाणी झेंडे एका टेबलावर ठेवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही बाब घोन्सालवीस आणि नाईक यांनी तात्काळ तहसिलदार किरण सुरवसे आणि प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी दोघांनीही याप्रकरणी सविस्तर माहिती घेऊन कळवतो, असे उत्तर दिले.कायद्यानुसार तिरंगा झेंडा गुंडाळून आडवा ठेवण्यास मनाई आहे. मात्र, गेल्या दोन तीन वर्षांपासून तहसिल कचेरीसमोर झेंडावंदनाआधी तिरंगा टेबलावर आडवा ठेवण्यात येत आहे. प्रत्येकवेळी आम्ही तक्रार करतो तेंव्हा अधिकारी माहिती घेऊन सांगतो इतकेच उत्तर देतात. यंदाही याप्रकाराची पुनवृत्ती झाल्याने तक्रार केली. अधिकारी कर्मचाºयांना नियम आणि ध्वजसंहितेची माहिती नसल्याने असा प्रकार सुरु आहे. तो थांबला पाहिजे इतकीच अपेक्षा आहे., असे घोन्सालवीस यांनी सांगितले. अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता शनिवारी सुट्टी असल्याने प्रांताधिकारी आणि तहसिलदारांशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Indiaभारत